चला हवा येऊ द्या या शोने अमाप लोकप्रियता मिळवली. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगात या शोचे लाखो फॅन्स आहेत. हा शो तर मोठा झालाच सोबतच शोमधील कलाकारांना देखील मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. या शोमुळे घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशलने त्याच्या विनोदबुद्धीच्या जोरावर, हजरजबाबीपणामुळे त्याने स्वतःची एक वेगळी ओळख आणि नावलौकिक मिळवला आहे.
View this post on Instagram
कुशल हा एक विनोदवीर असण्यासोबतच पट्टीचा अभिनेता देखील आहे. तो प्रत्येक भूमिका अगदी लीलया साकारत असतो. चला हवा येऊ द्या या शोने कुशलला एक नवीन ओळख मिळवून दिली. याआधी त्याने अनेक शो केले मात्र हा श खास ठरला. कुशलचा सोशल मीडियावरचा वावर चांगला असून, तो नेहमीच विविध पोस्ट शेअर करत फॅन्सच्या संपर्कात असतो. त्याच्या पोस्टमुळे तो सतत चर्चेत येत असतो. आज देखील कुशल त्याच्या एका पोस्टमुळे चांगलाच गाजत आहे. कुशल इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचा एक फोटो शेअर करत गुंतवणुकीबद्दल सांगितले आहे.
कुशलने त्याचा एक स्टायलिश फोटो पोस्ट करत लिहिले, “Investment चुकली की loss होतोच , कधीकधी तर आपला मुद्दलमाल सुद्धा परत मिळत नाही. सगळं बाजारावर depend करतं.
Emotional investments ना सुद्धा हाच नियम लागू पडतो. फरक एवढाच आहे की इथे investment चुकली की माणसाचाच बाजार उठतो. (अपने आपको पूरी सावधानी से invest करे! ) आता कुशलने ही पोस्ट नक्की कोणासाठी पोस्ट केली आहे, हे अजूनही माहित नाही. मात्र त्याला या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत गुंतवणूक योग्य करण्याचा सल्ला दिला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नाद कार पण…! शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई
अथिया शेट्टीचा नमस्कार करताना दिसला अहान शेट्टी, फोटो पोस्ट करत म्हणाला…