Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मी मेल्यानंतर…’, ‘पांडू’ सिनेमातील नवीन गाणे प्रदर्शित झाल्यानंतर का केली कुशल बद्रिकेने अशी पोस्ट?

झी मराठीवरील लोकप्रिय आणि तुफान गाजणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून नावारूपास आलेल्या अभिनेता आणि विनोदवीर कुशल बद्रिके आज कोणालाच नवीन नाही. कुशलने अगदी संघर्षाने आणि मेहनतीने स्वतःचे नाव या क्षेत्रात तयार केले आहे. अतिशय छोट्या लक्षात न येणाऱ्या भूमिका करून तो आज इथवर पोहचला आहे. कुशल सारखाच अजून एक अभिनेता म्हणजे भाऊ कदम. नाव ऐकूनच चेहऱ्यावर हसू आणणारा भाऊ देखील केवळ आणि केवळ मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात यशाचा झेंडा गाडून उभा आहे. हे दोन्ही विनोदवीर शोच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवतात. लवकरच त्यांचा ‘पांडू’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

सध्या सर्वत्र फक्त या ‘पांडू’ सिनेमाचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. सिनेमाचं ट्रेलर, गाणी, कलाकार सर्वच प्रचंड ट्रेडिंगमध्ये असून, सर्वच लोकं आतुरतेने या सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘दादा परत या ना हसवा ना… ‘ हे गाणे प्रदर्शित झाले असून, या गाण्याला प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसातच हे गाणे हिट ठरले असून, या गाण्यात कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या दोघांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मात्र या गाण्याच्या प्रदर्शनानंतर कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट सध्या खूपच गाजताना दिसत आहे. यासोबतच कुशलने पोस्टमध्ये लिहिलेला मजकूर वाचून अनेकांना आश्चर्य देखील वाटत आहे.

कुशल बद्रिकेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून, त्यात त्याने म्हटले आहे की, “मी मेल्यानंतर मीडियाकडे एक तरी गाण असाव वाजवायला ज्यात मी आहे. असं मला कायम वाटायचं, असं एक जबरी गाण दिल्याबद्दल अवधूत गुप्ते सर सगळ्यात आधी तुम्हाला लै लै थँक्यू. “ मित्रांनो गाण नक्की बघा,” असे म्हणत त्याने सर्वांना हे गाणे बघण्याची विनंती देखील केली आहे. या पोस्टसोबतच त्याने या गाण्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. पांडू सिनेमातील सर्वच्या सर्च गाणी तुफान हिट झाली असून, सगळीकडे हीच गाणी ऐकायला मिळत आहे.

‘दादा परत या ना हसवा ना… ‘ हे गाणे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अवधूत गुप्तेने संगीतबद्ध केले असून आदर्श शिंदेने स्वरबद्ध केले आहे. ‘पांडू’ या चित्रपटाची कथा आहे दोन मित्रांची.या चित्रपटात भाऊ कदम हे पांडूच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर कुशल बद्रिके महादूच्या भूमिकेत दिसणार आहे. विजू मने दिग्दर्शित “पांडू” हा चित्रपट येत्या ३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

टेलिव्हिजन विश्वातील ‘या’ अभिनेत्रींनी निवडला दुसऱ्या क्षेत्रात कार्यरत असणारा जोडीदार

लग्नाच्या नुसत्या नावाने देखील चिडायची काजोल, मात्र अजयला भेटल्यानंतर बदलले विचार

बिकिनी घालून पोहणाऱ्या ‘या’ कोरिओग्राफरने लावली पाण्यात आग

हे देखील वाचा