Saturday, July 6, 2024

‘खाण्याची घाई समजू शकतो गाण्याची कसली घाई…’, म्हणत कुशल बद्रिकेने शेअर केला मजेशीर व्हिडिओ

 

मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांचा आवडता आणि हक्काचा शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ या शोने हा हा म्हणता केवळ महाराष्ट्रात नव्हे तर अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात ख्याती पोहचवली आहे. मराठीमध्ये अनेक कॉमेडी शो आले आणि गेले परंतु ‘चला हवा येऊ द्या’ने प्रेक्षकांच्या मनावर त्याचे नाव सुवर्ण अक्षराने कोरून ठेवले आहे. या शोचे यश म्हणजे शोमधील विविध कलागुण असलेले कलाकार. याच कलाकारांनी या शोला सातासमुद्रा पार नेले आहे. कुशल बद्रिके, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे या अष्टपैलू कलाकारांना एकत्र घेऊन निलेश साबळेने मराठीमध्ये एक आगळावेगळा प्रयोग सुरु केला. ज्याला आज प्रचंड मागणी आहे. याच शोमधील दोन अतरंगी कलाकारांचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे.

अभिनेता कुशल बद्रिके याने सोशल मीडियावर त्याचा आणि भाऊ कदमचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला कुशल म्हणतो की, “आज आम्ही गाडीत एकत्र असताना रेडिओवर खूप सुंदर गाणी ऐकली अचानक जुना काळ आठवला. त्याचीच एक झलक इथे दाखवतो.” यानंतर कुशल गाणी गात असतो आणि भाऊ त्याला एक भांडे वाजवत ताल देत असतो. कुशल जेव्हा गाणी गात असतो तेव्हा भाऊ अचानक मधेच दुसरे गाणे सुरु करतो. यानंतर कुशल खूप वेळा ऐकून घेतो आणि शेवटी रागाने निघून जातो.  (actor kushal badrike share a comedy video with bhau kadm on social media)

हा व्हिडिओ शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “खाण्याची घाई समजू शकतो पण गाण्याची कसली घाई असते मित्रांना काय माहित? तुमच्या आयुष्यातही आहेत का अशी माणसं?” त्यांच्या या मजेशीर व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. या व्हिडिओवर अभिनेता अभिजित खांडकेकर याने “गाए तो गाए कैसे” अशी कमेंट केली आहे. यासोबतच स्पृहा जोशी आणि प्रथमेश परब यांनी हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते देखील या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

कुशल बद्रिके आणि भाऊ कदम हे दोघेही अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांनी याआधी अनेक चित्रपटात तसेच रियॅलिटी शोमध्ये काम केले आहे. पण ‘चला हवा येऊ द्या’ शोने त्यांना खरी ओळख दिली.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा