Thursday, July 18, 2024

‘ब्लॅक अँड व्हाईट चालेल पण बरबाद करणारे रंग नको’, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

आपल्या विनोदी अभिनयाने आज घराघरातील लोकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. त्याच्या दिलखुलासा अभिनयाने आणि विनोदाने आज कितीतरी लोकांच्या आयुष्यातील दुःख कमी झाले आहे. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम तर सर्वानाच माहीत आहे. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यातील कलाकार.

प्रत्येकामध्ये एक वेगळेच टॅलेंट दडलेले आहे. अनेकवेळा फारुळे बाई, पत्रकार, पोलीस यासारख्या अनेक भूमिकेतून प्रेक्षकांना हास्याच्या महासागरात सोडून देणारा विनोदी कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. कुशल हा सोशल मीडियाचा देखील पुरेपूर वापर करत असतो. अशातच त्याने नुकतेच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोपेक्षा त्याने दिलेले कॅप्शन चांगलेच चर्चेत आले आहे.

त्याने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून त्याचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “एखाद्या फोटो मधले रंग “burst” झाले की तो फोटो घाणेरडा दिसतो, मग त्या फोटोला black and white करायचं , तोच फोटो एकदम भारी दिसायला लागतो.आयुष्याचही तसंच आहे ,black and white चालेल पण बरबाद करणारे रंग नकोत.” त्यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. त्याच्या चाहत्यांना त्याचा या लुक खूप आवडला आहे.

कुशल बद्रिके हा एक विनोदी कलाकार आहे. तो सध्या झी मराठीवरील सर्वात चर्चेत असणारा शो ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये काम करत आहे. त्याने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये येण्याच्या आधी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘बायोस्कोप’, ‘डावपेच’, ‘स्लॅमबुक’, ‘रंपाट’, ‘लूज कंट्रोल’, ‘जत्रा’, ‘खेळ मांडला’ या चित्रपटात काम केले आहे. सोबतच त्याने ‘फू बाई फू’मध्ये देखील काम केले आहे. तिथूनच तो नावारूपाला आला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा