Wednesday, July 3, 2024

महेश बाबूला राग अनावर, ६ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या हृदयद्रावक अत्याचारावर केलं ‘हे’ ट्वीट

आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये नाव कमावताना दिसत आहेत. चित्रपटांपासून ते अंतराळापर्यंत आजची महिला पोहचलेली आहे. घरातील एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. कुटुंब सुधारले की, समाज सुधारतो आणि असे करता करता देशाची प्रगती होते, असे अनेक जाणकार म्हणतात. परंतु आजही अनेक भागांमध्ये स्त्रियांवरील होणारे अन्याय अत्याचार थांबलेले नाहीत. अशात तेलंगणामध्ये काळजावर आघात करणारी घटना घडली आहे. अवघ्या ६ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्काराची घटना घडली आहे. यावर अभिनेता महेश बाबू याने याचा निषेध व्यक्त करत, सदर घटनेविषयी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांमधील अभिनेता महेश बाबूने भविष्यातील परिस्थितीवर देखील प्रश्न उपस्थित करत सर्वांना सुन्न करून टाकले आहे. त्याने आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक ट्वीट करत लिहिले आहे की, “सिंगनेरी कॉलनीमधील ६ वर्षांच्या चिमुकलीबरोबर झालेली घटना या गोष्टीची आठवण करून देते की, एक समाज म्हणून आपण किती खालची पातळी गाठली आहे. आपल्या मुली कधी सुरक्षित होणार आहेत? अंगावर शहारे आणणारी घटना… विचार देखील करवत नाही की, तिच्या कुटूंबियांना किती वेदना झाल्या असतील.”

 

यानंतर त्याने अधिकाऱ्यांना त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आणखी एक ट्वीट करत लिहिले आहे की, “मी या प्रकरणी तेथील अधिकाऱ्यांना विंनती करतो की, लवकरात लवकर त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्या.”

ही घटना ९ सप्टेंबर रोजी घडली. गेल्या आठवड्यात सिंगनेरी कॉलनीमधील ६ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. तिचे वडील एक रिक्षा चालक आहेत. मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार त्यांनी तेथील पोलिस स्टेशनमध्ये केली होती. त्यानंतर एका अज्ञात ठिकाणी या ६ वर्षांच्या चिमुकलीचे शव सापडले. मन हादरून टाकणाऱ्या या घटनेवर महेश बाबूनंतर कला विश्वातील अनेक व्यक्तींनी आपली प्रतिक्रिया दिली. अनेकांनी सोशल मीडिया मार्फत मुलीला लवकर न्याय मिळावा असे म्हटले आहे. परंतु अद्याप पोलिसांच्या हाती कुठलेही पुरावे लागलेले नाहीत.

या घटनेचा पोलीस कसून तपास करत आहेत. परंतु त्यांना अजून यश आले नसून, त्यांनी आरोपीला शोधल्यास १० लाखांचे बक्षीस देखील जाहीर केले आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांमधील सुप्रसिद्ध अभिनेता महेश बाबूने अभिनय क्षेत्रात मोठी कामगिरी केलेली आहे. लवकरच त्याचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे तो ‘सरकुरु वारी पाटा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन परशुराम करत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा अवॉर्ड मिळताच अमरीश पुरींसोबत हस्तांदोलन करायला विसरल्या नीना गुप्ता; व्हायरल होतोय जुना व्हिडिओ

-KBC: ‘शानदार शुक्रवार’च्या भागात ‘या’ खेळाडूंनी लावले चारचांद, अमिताभ यांना अश्रू अनावर

-Bigg Boss OTT: राकेश अन् शमिताच्या वाढत्या जवळीकतेबद्दल बोलली पूर्व पत्नी, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा