Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

काय सांगता! मलायका अरोराला मिळाला नवीन जोडीदार? चाहत्यांना झाली अर्जुन कपूरची आठवण

फिटनेस फ्रिक मलायका अरोरा नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि फॅशन स्टाईलने चाहत्यांना वेड लावते. यावेळी मलायका तिच्या ड्रेसमुळे आणि लूकमुळे नाही, तर तिच्या नवीन व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या अभिनेत्रीने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिचा अंदाज पाहून चाहते आनंदी झाले आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांना अर्जुन कपूरची आठवण कशी येणार नाही. नुकताच मलायकाने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती योगा मॅटवर आपल्या क्यूट श्वानासोबत खेळताना दिसत आहे.

मलायका सिंपल एक्सरसाइज आऊटफिटमध्ये योगा करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ शेअर करत मलायकाने कॅप्शनमध्ये “प्ले टाइम किंवा मी टाइम,” असे लिहिले आहे.

तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ५० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. मलायकाच्या या व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत चाहते व्हिडिओला पसंती देत आहेत. मलायकाच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, “तुमचा जीवन जगण्याचा अंदाज आवडत आहे.” दुसऱ्या एकाने म्हटले की, “छान.” तसेच आणखी एकाने “क्यूट,” असे लिहिले आहे. त्याचवेळी एका चाहत्याला अर्जुन कपूरचीही आठवण आली आहे.

या व्हिडिओमध्ये तिने एका बाजूला केसांची वेणी घातली आहे. मलायकाने कॅस्परचा (तिचा श्वान) व्हिडिओ शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही ती कॅस्परसोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. अलीकडेच मलायकाने मुलगा अरहानसोबत कॅस्परचा एक फोटो शेअर केला, ज्यात तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “माय डिअरेस्ट, माय लाईफ, माय एव्हरिथिंग.”

मलायका अरोरा अनेकदा जिमला जाताना पॅपराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याशिवाय, अभिनेत्री तिच्या नवीन लूकने चाहत्यांचे लक्ष वेधत राहते. मलायकाची खासियत म्हणजे गाऊन असो की साडी किंवा मॉडर्न ड्रेस, ती प्रत्येक प्रकारच्या ड्रेसमध्ये कमाल दिसते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर मलायका सध्या ‘सुपरमॉडेल ऑफ द इयर’ रियॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. याशिवाय, ती लवकरच सुरू होणाऱ्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये परीक्षक म्हणून दिसणार आहे. यामध्ये टेरेन्स लुईस आणि गीता कपूर देखील तिच्यासोबत परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडेच तिघेही शोच्या प्रमोशनाच्या संदर्भात ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी

-काय सांगता? ज्याने आर्यन खानला ‘धरलं’ तोच निघाला फरार आरोपी, क्रूझ प्रकरणात नवा ट्विस्ट

-‘यामुळे’ देवोलीना भट्टाचार्जीवर भडकले सिद्धार्थ शुक्लाचे चाहते, स्पष्टीकरण देत अभिनेत्री म्हणाली…

हे देखील वाचा