Saturday, July 6, 2024

‘खऱ्या आयुष्यात बिल्कुल शिवी देत नाही’ म्हणणाऱ्या मनोज वाजपेयींचा आवडती शिवी सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल

आपणा सर्वांनाच माहिती आहे की, प्रत्येक कलाकाराचं पडद्यावरील आयुष्य हे त्याच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा खूप म्हणजे खूपच वेगळं असतं. जसा तो पडद्यावर वावरतो किंवा अभिनय करतो, त्याप्रकारे तो आपल्या खऱ्या आयुष्यात त्याउलट असतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. असेच काहीसे आहे ते प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयी यांच्याबाबत. खरं तर मनोज हे आपल्या बहुप्रतिक्षित ‘द फॅमिली मॅन २’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. यामध्ये त्यांनी ‘श्रीकांत तिवारी’ ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेत ते ज्याप्रकारे वागतात, तसे खऱ्या आयुष्यात ते कधीच नाहीत. ते या भूमिकेतील एकही गोष्ट फॉलो करत नाहीत. श्रीकांत तिवारी शिव्या देतो, तर दुसरीकडे मनोज आपल्या खऱ्या आयुष्यात शिव्या देत नाहीत. याबाबत त्यांनी स्वत: सांगितले आहे.

खरं तर या वेबसीरिजच्या ट्रेलरमध्ये मनोज शिवी देताना दिसले होते. एक सीन असतो, ज्यामध्ये श्रीकांत आणि त्यांची पत्नी कपल थेरपी सेशनमध्ये जातात. यामध्ये आपल्या परिस्थितीनुसार मनोज, चित्रपटातील डायलॉग बोलतात आणि त्यानंतर शेवटी ते शिवी देतात, जी बीप (शिवी ऐकवली जात नाही) केली जाते. हा सीन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आता यावर मनोज यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत बॉलिवूड हंगामाशी चर्चा करताना मनोज यांनी सांगितले की, “मी आपल्या खऱ्या आयुष्यात बिल्कुल शिवी देत नाही. शोमध्ये जो जीता वहीं सिकंदरच्या डायलॉगनंतर जी शिवी येते, ती खऱ्या आयुष्यात मी कधीच वापरली नाही आणि ती शिवी खरंच इतकी घाण वाटते की, माहिती नाही ती माझ्या तोंडून कशी निघाली. कारण तुम्ही पूर्ण वेळ श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत तुम्ही असता. यानंतर मी स्वत:चं डोकं पकडलं आणि स्वत: ला म्हटलं, अरे यार हे लोक आता हेच ठेवणार, आणि त्यांनीही हेच ठेवले.”

शिवीचा व्हिडिओ व्हायरल
आता मनोज यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मनोज यांच्यासह विजय राजही दिसत आहेत. व्हिडिओत मनोज म्हणतात की, शिवी देण्यात मजा येते आणि यामध्ये भावना असतात, ज्या बाहेर पडतात. यानंतर मनोज विजयला आपली आवडती शिवी सांगतात. दुसरीकडे विजयही मनोज यांना आपली आवडती शिवी सांगतात.

आता चाहते गोंधळात पडले आहेत की, मनोज यांचे म्हणणे आहे की, त्यांनी कधीही शिवी दिली नाही. अशात या व्हिडिओमध्ये ते असे काम म्हणत आहेत की, त्यांना शिवी देण्यात मजा येते.

दिग्दर्शकांना आवडली शिवी
दुसरीकडे मनोज यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी सांगितले की, त्यांचे दिग्दर्शक राज आणि डीके यांनी शिवी आवडली आहे. त्यामुळे त्यांनी ती या वेबसीरिजमध्ये ती ठेवली. त्यांनी सांगितले की, “बिल्कुल असे झाले. मी राज आणि डीके यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी म्हटले, ही चांगली वाटत आहे. यानंतर ते उड्या मारू लागले की, ही शिवी बदलणार नाही. हे श्रीकांतसोबत पूर्ण जाते. मी कधीच आपल्या आयुष्यात या शब्दाचा वापर केला नाही. तसेच कधी करणारही नाही. कारण सोशल मीडिया असे प्लॅटफॉर्म आहे, जे मला चावण्यासाठी येत राहते.”

वेबसीरिजबद्दल बोलायचं झालं, तर ‘द फॅमिली मॅन २’मध्ये श्रीकांत एका नवीन आव्हानाशी आणि खलनायकांशी लढणार आहे. या सिझनमध्ये मनोज यांच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीही झळकणार आहे. समंथाने या वेबसीरिजमधून डिजिटल पदार्पण केले आहे. या वेबसीरिजचा दुसरा सिझन येत्या ४ जून रोजी रिलीझ केला जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा