Monday, July 8, 2024

मनोज वाजपेयी यांच्या वडिलांची प्रकृती बिघडली, शूटिंग सोडून अभिनेते केरळहून दिल्लीला रवाना

प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांचे वडील मागील काही दिवसांपासून आजारी होते. शुक्रवारी (१७ सप्टेंबर) गंभीर अवस्थेत त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडिलांची प्रकृती बिघडल्याची बातमी मिळताच मनोज केरळमधील आपल्या चित्रपटाची शूटिंग सोडून दिल्लीला रवाना झाले.

मनोज यांचे वडील राधाकांत वाजपेयी हे व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांचे वय ८३ वर्षे आहे. खरं तर, मनोज हे आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग केरळमध्ये करत असताना त्यांना त्यांच्या वडिलांच्या आजाराची बातमी मिळाली. त्यानंतर, बातमी मिळताच मनोज हे शूटिंग अर्ध्यातच सोडून दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

या आधीही, याच वर्षी जून महिन्यामध्ये मनोज यांच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीची बातमी मिळताच, मनोज आपल्या कुटुंबासह बिहारमधील त्यांच्या गावी निघाले होते. मात्र, फ्लाईट मिस झाल्याने त्यांना मुंबईहून बेतियाला कारने जावे लागले होते.

अभिनेते मनोज वाजपेयी यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, ते आपल्या आई आणि वडिलांच्या खूप जवळ आहेत. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले होते की, त्यांच्या वडिलांनी त्यांचे आणि त्यांच्या भावंडांच्या शिक्षणासाठी खूप संघर्ष केला आहे. वडिलांनी अभिनेते मनोज यांचे नाव त्यांचे आवडते दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांच्या नावावर ठेवले होते.

मनोज यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ते शेवटचे ‘डायल १००’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री नीना गुप्ता आणि साक्षी तंवर देखील दिसल्या होत्या. याशिवाय ते ‘द फॅमिली मॅन २’ या स्पाय थ्रिलर वेब सीरिजमध्ये देखील दिसले होते. राज आणि डीके या प्रसिद्ध दिग्दर्शकाने याचे दिग्दर्शन केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लय भारी’ तेजस्विनीच्या मराठमोळ्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ, पदरावरील ‘त्या’ श्लोकाने वेधले खास लक्ष

-‘दिसला गं बाई दिसला’, म्हणणाऱ्या ‘राजा राणीची गं जोडी’ फेम संजूचा गावरान अवतार भावला नेटकऱ्यांना

-सूरज पांचोलीला दिलासा, जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआयची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली

हे देखील वाचा