Tuesday, February 3, 2026
Home कॅलेंडर प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते मायकेल के विल्यम्स यांचे निधन, स्वत: च्याच घरात आढळले मृत अवस्थेत

प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते मायकेल के विल्यम्स यांचे निधन, स्वत: च्याच घरात आढळले मृत अवस्थेत

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मायकल के विल्यम्स यांचे सोमवारी (६ सप्टेंबर) निधन झाले. ते न्यूयॉर्क शहरातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळले. न्यूयॉर्क पोलिसांना सोमवारी ५४ वर्षीय विल्यम्स यांचा मृतदेह त्यांच्याच घरात सापडला. मात्र, अद्याप त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. न्यूयॉर्क पोलीस विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

न्यूयॉर्क पोलिस विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट जो गिमोएल यांनी सांगितले की, ६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ब्रुकलिनमधील विल्यम्स अपार्टमेंटमधून पोलिसांना आपत्कालीन कॉल आला. त्यानंतर पोलीस अभिनेत्याच्या घरी पोहोचले. विल्यम्स यांच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचल्यावर पोलिसांना ते मृत अवस्थेत आढळले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळावरून औषधे जप्त केली. अशा परिस्थितीत, अशी अंदाज व्यक्त केली जात आहे की, अभिनेत्याचा मृत्यू औषधांच्या अतिसेवनाने झाला असावा. सध्या पोलिसांनी विल्यम्स यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. यासह पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

‘एमी’ पुरस्कारासाठी झाले होते नामांकित
टीव्ही मालिका ‘द वायर’ फेम मायकेल के विल्यम्स एचबीओच्या लव्हक्राफ्ट कंट्रीमध्ये त्यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. या मालिकेतील कामगिरीसाठी विल्यम्स यांना २०२१ मध्ये एमी पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते.

टीव्ही शो ‘द वायर’ मधून मिळाली लोकप्रियता
विल्यम्स यांना टीव्ही शो ‘द वायर’ मधून लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये अभिनेता ड्रग डीलर ओमर लिटल नावाच्या एका खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. शोमध्ये विल्यम्सची भूमिका एका गुन्हेगाराची होती.

ब्रुकलिनमध्ये झाला जन्म
ब्रुकलिनमध्ये जन्मलेले विल्यम्स दोन दशकांहून अधिक काळ अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसले होते. यात एचबीओ मालिका ‘बोर्डवॉक एम्पायर’, ‘लव्हक्राफ्ट कंट्री’ आणि ‘१२ इयर्स ए स्लेव्ह’, ‘असेसिन क्रीड’ आणि ‘गॉन बेबी गॉन’ या चित्रपटांचा समावेश आहे.

समलिंगीच्या भूमिकेत आले समोर
‘द वायर’ या शोचे पाच सीझन होते, ज्यात विल्यम्स यांनी त्यांच्या दमदार कामगिरीमुळे प्रेक्षकांची वाहवा मिळवली. प्रत्येक सीझनमध्ये त्यांच्या व्यक्तिरेखेत एक नाविन्यता होती. या शोमध्ये तो तृतीयपंथी म्हणून दिसले. या पात्राद्वारे त्याने समलिंगी पुरुष म्हणून टीव्हीची बंधनेही मोडली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारसोबत केले होते पदार्पण; मात्र सुंदरतेने वेड लावलेली शांतीप्रिया आज का राहतेय बॉलिवूडपासून दूर?

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा

 

 

हे देखील वाचा