Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन Video | शोमध्ये भारती सिंग म्हणाली ‘असं’ काही, ते ऐकून स्वतःलाच मारू लागले मिथुन चक्रवर्ती

Video | शोमध्ये भारती सिंग म्हणाली ‘असं’ काही, ते ऐकून स्वतःलाच मारू लागले मिथुन चक्रवर्ती

टीव्हीची कॉमेडियन क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग (Bharti Singh) ताशेरे ओढण्याच्या बाबतीत कोणालाच सोडत नाही. मग तिच्यासमोर रोहित शेट्टीसारखा दिग्दर्शक उभा असो वा कुठलाही अभिनेता. भारतीच्या उपस्थितीची परिस्थिती अशी आहे की, कधी कधी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakrawarti) देखील तिच्यासमोर बोलायचे थांबतात. नुकतेच मिथुन यांच्यासोबत असेच काहीसे घडले जेव्हा भारतीने त्यांची सर्वांसमोर खेचायला सुरुवात केली. कलर्सने याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

खरंतर, बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) या वीकेंडच्या रियॅलिटी शो ‘हुनरबाज’मध्ये (Hunarbaaz) पाहुणी म्हणून येणार आहे. व्हिडिओमध्ये भारती आणि हर्ष स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे. तेव्हा भारती म्हणते की, “माधुरी मॅडम, तुम्ही आलात आणि दादामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. नाहीतर करण सर तिथे बसलेले असतात आणि मध्ये परी असते, तरीही दादा खजूर खात असतात.” हे ऐकून परिणीती देखील म्हणते की, “आज दादाने खजूर मागितल्या नाहीत.” पण तरीही भारती थांबत नाही, त्यानंतर ती प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दोन महिलांबद्दल बोलून मिथुन दाची छेड काढते.

यानंतर मिथुन दा चिडतात आणि भारती-हर्षला म्हणतात की, “तुम्ही दोघे माझ्यासाठी भुकंप आहात. माझ्या घरात प्रॉब्लेम निर्माण करूनच जाल. तीनवेळा लाथ मारून बाहेर आलो असे कितीदा सांगितले.” खर तर अभिनेते असे विनोदात बोलत होते. शेवटी, मिथुन रोमान्सच्या बाबतीत म्हणतात की, “मला अभिमान आहे की मी एक कुशल व्यक्ती आहे.”

अमृतसरमध्ये जन्मलेल्या भारतीने मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे. भारतीने तिच्या मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर आयुष्यात यश मिळवले आहे. प्रेक्षकांना हसवून आणि लक्झरी लाईफ जगून भारती आज करोडपती झाली आहे. एवढेच नाही, तर भारती ‘द कपिल शर्मा शो’च्या एका एपिसोडमध्ये काही मिनिटांसाठी लाखो रुपये फी घेते.

भारतीने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले. भारती आणि हर्ष दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर दोघांनी लग्न केले. भारती सिंग आता आई होणार आहे. भारतीने अलीकडेच तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

मिथुन चक्रवर्ती यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ते करण जोहर आणि परिणीती चोप्रा यांच्यासह ‘हुनरबाज… देश की शान’ला परीक्षण करत आहेत. या शोमधून परिणीती चोप्राने टीव्ही जगतात पदार्पण केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा