सध्या देशात तणावाची परिस्थिती आहे. याव्यतिरिक्त मनोरंजन क्षेत्रातूनही सातत्याने चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत आहेत. परंतु अशा परिस्थितीत टीव्ही इंडस्ट्रीमधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. टीव्ही अभिनेता मोहित मलिकच्या घरी छोट्या पाहुण्याची धमाकेदार एंट्री झाली आहे. म्हणजेच अभिनेता बाबा झाला आहे. खरं तर अभिनेत्री अदिती मलिकने गुरुवारी (२९ एप्रिल) मुलाला जन्म दिला आहे. पहिल्यांदाच आई- बाबा झाल्यानंतर अदिती आणि मोहितने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
अदितीने (Addite Malik) आपल्या मुलाला कुशीत घेतल्याचा एक फोटो शेअर केला आहे. यात ती आपल्या मुलाचे लहान बोट पकडताना दिसत आहे. तिने या आनंदासाठी धन्यवाद दिला आहे. तिचे असे म्हणणे आहे की, तिचा मुलगा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे.
तिने फोटो शेअर करत लिहिलेे की, “प्रिय ब्रह्मांड, तुझ्या आशीर्वादासाठी धन्यवाद. आमच्या मुलाला आमच्या आयुष्यात आणण्यासाठी तुझे खूप खूप आभार. आता तो इथे आहे हे कोणत्याही जादूपेक्षा कमी नाहीये. आम्ही दोनपासून आता तीन झालो आहोत. बेबी मलिकचे आई- बाबा… मोहित आणि अदिती.”
यासोबतच मोहित मलिकनेही (Mohit Malik) एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तो अदितीचा हात पकडताना दिसत आहे आणि मुलगा पाळण्यात झोपल्याचे दिसत आहे. त्यांच्या या आनंदाच्या बातमीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अदिती आणि मोहितची भेट पहिल्यांदा टीव्ही शो ‘बनूं मैं तेरी दुल्हन’च्या सेटवर झाली होती. या शोदरम्यान त्यांच्या मैत्रीमध्येे वाढ झाली आणि मैत्री प्रेमात बदलली. त्यांनी सन २०१० मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर लग्न केले. लग्नानंतर तब्बल ११ वर्षांनंतर दोघेही आई- वडील झाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खरंच! आयुष्यातील पहिली किस म्हणत रणबीर कपूरने घेतले होते माधुरी दीक्षितचे नाव, सांगितले कधी आणि कसे
-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल