Friday, July 5, 2024

मोहित रैनाने शेअर केले पत्नी अदितीसोबतचे रोमॅंटिक फोटो, फॅन्स म्हणाले ‘पार्वतीचा चेहरा तर स्पष्ट दाखव’

‘देवो के देव महादेव’ या मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळालेला अभिनेता मोहित रैना (Mohit Raina) सर्वांना आठवतच असेल. मोहीतला या मालिकेने लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. अतिशय हँडसम आणि देखणा असलेल्या मोहितने या मनोरंजनविश्वात चांगलेच नाव कमावले. सोशल मीडियावरही त्याची फॅन फॉलोविंग तगडी आहे. ‘महादेव’ ही त्याची ओळख प्रत्येकाच्याच मनावर कोरली गेली असल्याने त्याला पाहिले की, सर्वांना आधी त्याची ‘महादेव’ हीच भूमिका आठवते. मोहित या मालिकेनंतर काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील झळकला.

मोहितसाठी २०२२ या नवीन वर्षाची सुरुवात खूपच सुंदर आणि अविस्मरणीय अशी झाली. कारण मोहितने १ जानेवारी २०२२ ला लगीनगाठ बांधली. त्याने लग्न खूपच लपून आणि मीडियापासून गुप्त ठेऊन केले. लग्नानंतर त्याने त्याच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र त्याने व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने त्याच्या पत्नीसोबतचे अदिती शर्मासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तो अदितीसोबत काही गोड क्षण व्यतीत करत असून, त्याच्या फॅन्सला हे फोटो खूपच आवडले आहेत.

मोहितने त्याच्या पत्नीसोबत अदितीसोबत काही सेल्फी फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये त्याने त्याच्या पत्नीला मिठी मारली, दुसऱ्या फोटोमध्ये तो त्याच्या पत्नीसोबत बाईक राईडचा आनंद घेत आहे. मोहितने अनेक फोटो शेअर केले असले तरी यापैकी एकही फोटोमध्ये अदितीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. या फोटोंवरून त्याचे फॅन्स त्याचे पाय खेचत मजा देखील घेत आहेत. सध्या इंटरनेटवर हे फोटो तुफान व्हायरल झाले असून त्यावर भरभरून कमेंट्स येत आहेत. महादेव मालिकेत मौनी रॉयने सतीची भूमिका साकारली होती. त्याच दरम्यान त्यांच्या अफेयरच्या तुफान चर्चा रंगल्या. मात्र २०१८ साली ते वेगळे झाले.

  हेही वाचा –

 

हे देखील वाचा