Friday, July 5, 2024

दिवाळीनिमित्त निळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली भोजपुरी क्वीन मोनालिसा; एक नजर टाकाच

अयोध्येत भगवान रामच्या आगमनाचे प्रतीक म्हणून कार्तिक महिन्याच्या अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. यंदाची दिवाळी गुरुवारी ( ४ नोव्हेंबर) साजरी होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने अनेक कलाकार आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. केवळ बॉलिवूड कलाकारांनीच नाही, तर भोजपुरी इंडस्ट्रीतील कलाकारांनी देखील फोटो शेअर केले आहेत. भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्री मोनालिसाला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. मोनालिसाने हिंदी चित्रपटापासून भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपली अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. टीव्हीच्या दुनियेतील ती एक चमकता तारा आहे. अभिनयासोबतच मोनालिसा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. मोनालिसाने दिवाळीच्या निमित्ताने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

दिवाळीच्या मुहूर्तावर मोनालिसाने तिचा खास लूक चाहत्यांना दाखवला आहे. तिचा हा लूक पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला आहे. मोनालिसाने शेअर केलेल्या फोटोत तिने निळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. यासोबत तिने दागिनेही घातले आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिले की, “या दिवाळीत चमकण्याचा निर्णय घेतला आहे.”

चाहत्यांना मोनालिसाचे हे फोटो खूप आवडत आहेत. चाहते तिच्या या फोटोंवर प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली की, “खूप सुंदर.” तर दुसऱ्या चाहत्याने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. तिचे हे फोटो हजारो चाहत्यांनी लाईक केले आहेत. मोनालिसाने वेगवेगळ्या पोझ देत फोटो शेअर केले आहेत. काहींमध्ये ती हसताना, तर काहींमध्ये लाजताना दिसत आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मोनालिसा लवकरच वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. मोनालिसाने टीव्ही सीरियल ‘नजर’सोबत अनेक शोमध्ये काम केले आहे. भोजपुरी इंडस्ट्रीशिवाय तिने टीव्हीच्या दुनियेतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जाळ अन् धूर संगटच! मोनालिसाने क्रॉप टॉप ड्रेसमध्ये वाढवला सोशल मीडियाचा पारा, फोटो जोरदार व्हायरल

-करवाचौथला भांगेत सिंदूर अन् कपाळावर टिकली लावून पारंपारिक लूकमध्ये दिसली मोनालिसा; लाल लेहंग्यात सपनाचाही जलवा

-नवरात्रीच्या निमित्ताने चाहत्यांना पाहायला मिळाला बोल्ड मोनालिसाचा पारंपारिक अंदाज, पाहा फोटो

हे देखील वाचा