Monday, July 1, 2024

कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

छोट्या पडद्यावर ‘नागिन’ या मालिकेतून आपली ओळख घराघरात पोहोचवून, प्रचंड प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. मौनी गेल्या काही काळापासून सतत सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. तिच्या सुंदर फोटोंमुळे तिचे चाहते बेधुंद होत आहेत. त्याचबरोबर या फोटोंमध्ये मौनीने तिच्या शर्टची बटणे उघडून जबरदस्त पोझ दिली आहे. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

पाहा मोनीचा हा किलर लूक
मौनी रॉयचा एक अतिशय वेगळा अंदाज या फोटोंमध्ये दिसत आहे. ती नेहमीच काहीतरी वेगळा आणि स्टायलिश लूक करून, बोल्ड अंदाजात फोटोशूट करत असते. यावेळी तिने रॅश जीन्ससह हिरवा शर्ट परिधान केला आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे तिने आपल्या शर्टचे संपूर्ण बटन उघडले आहे. एवढेच नाही, तर तिने शर्टच्या आत कोणतीही अंतर्वस्त्र किंवा वेगळं काही घातलेलं नाही. तिच्या या बोल्ड लूकने सर्व चाहत्यांना वेड लावलं आहे.

कॅप्शनमध्ये प्रेम आणि हृदयाबद्दल बोलतेय अभिनेत्री
हे फोटो शेअर करताना मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला आशा आणि प्रेमाबद्दल लिहा आणि जे हृदयाने सहन केले आहे…” यापूर्वी मौनीने जंगलात बिकिनी परिधान करून फोटोशूट केले होते. तिच्या या फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं होतं. तसेच मौनी या फोटोंमुळे प्रचंड चर्चेचा विषय बनली होती.

‘या’ बिग बजेट चित्रपटात दिसणार अभिनेत्री
मौनी रॉयच्या वर्क फ्रंटवर बोलायचं झालं, तर मौनी लवकरच बिग बजेट आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सोबत दिसणार आहे. अलीकडेच ती ‘लंडन कॉन्फिडेंशियल’ या वेब सीरिजमध्येही दिसली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा