Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड ‘आम्हालाही बॉयकॉट करा’, म्हणणाऱ्या तापसीवर भडकले मुकेश खन्ना; म्हणाले, ‘स्वत:ला स्टार समजणाऱ्या…’

‘आम्हालाही बॉयकॉट करा’, म्हणणाऱ्या तापसीवर भडकले मुकेश खन्ना; म्हणाले, ‘स्वत:ला स्टार समजणाऱ्या…’

सध्या सर्वाधिक चर्चेत काय असेल, तर ते म्हणजे बॉलिवूड सिनेमे आणि ‘बॉयकॉट ट्रेंड’ होय. याच ट्रेंडमुळे ‘सम्राट पृथ्वीराज‘, ‘लाल सिंग चड्ढा‘, ‘रक्षाबंधन‘ यांसारखे बिगबजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर सलग फ्लॉप ठरत आहेत. नेटकरी बॉलिवूड सिनेमांवर बहिष्कार टाकत आहेत. यामुळे अर्जुन कपूर आणि तापसी पन्नू यांसारखे कलाकारही चिंतेत पडले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेतही येत आहेत. बॉलिवूडची ही दुर्दशा पाहून ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी बॉलिवूडला चांगलेच झापले आहे. त्यांनी तापसीसोबतच अर्जुनबद्दलही नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले मुकेश खन्ना?
प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी म्हटले की, बॉलिवूडची आज जी स्थिती आहे, त्याला स्वत: बॉलिवूडच जबाबदार आहे. त्यांनी तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिच्यावर नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले की, “आमचे जे स्टार्स आहेत, अभिनेते आहेत, असे वाटते की, त्यांना जास्तच आत्मविश्वास आहे किंवा मग ते डोळे बंद करून येणाऱ्या मांजरीला बघू शकत नाहीयेत. तुम्ही पाहिलं असेल की, स्वत:ला स्टार समजणाऱ्या अभिनेत्रीने एक खूपच मूर्खपणाचे आणि बालिश विधान केले होते. ती म्हणाली होती की, आम्हालाही बॉयकॉट करा. असे विधान केले जाते का? अशावेळी केले जाणारे हे विधान निंदनीय आहे.”

अर्जुन कपूरवरही काढला राग
पुढे अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याचे नाव न घेता पुढे म्हणाले की, “एका अभिनेत्यानेही असे विधान केले, जो जनतेशी भांडायला तयार आहे. अरे जनता जनार्दन असते. तुझे सिनेमे कधी हिटही होतात, आणि फ्लॉपही होतात.” खरं तर, माध्यमांशी चर्चा करताना अर्जुन म्हणाला होता की, “मला वाटते की, आम्ही याबाबत शांत राहून खूपच मोठी चूक केली आहे. यांनी आमचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे. मला वाटते की, आम्ही हा विचार करून चूक केली की, आमचे कामच बोलेल. मला वाटते की, आम्ही खूप सहन केले आणि आता लोकांनीही ही सवय करून घेतली आहे.”

आता मुकेश खन्ना हे तापसी पन्नू आणि अर्जुन कपूर यांच्यावर साधलेल्या निशाण्यामुळे चर्चेत आले आहेत. प्रत्येक मुद्द्यावर परखड मत मांडणारे खन्ना हे सध्या माध्यमांमध्ये झळकताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशामुळे आमिर सोडणार भारत, पुढील आयुष्य घालवणार ‘या’ देशात?
‘कधीपर्यंत सहन करायचा अत्याचार?’, बिहारी विद्यार्थ्याच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच खेसारी लालची सटकली
क्या बात है! घटस्फोटानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले धनुष आणि ऐश्वर्या, खूपच खास आहे कारण

हे देखील वाचा