टॉलिवूड चित्रपटसृष्टीतील समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य ही रोमँटिक जोडी रविवारी (३ ऑक्टोबर) कायमची वेगळी झाली. मागील काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र, या सर्वांना या जोडप्याने पूर्णविराम लावला. त्यांनी आपापल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून घटस्फोट घेत असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली.
माध्यमांतील वृत्तांनुसार, समंथाला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून ५० कोटी रुपये मिळतील. असे असले, तरीही अभिनेत्रीने कथितरीत्या पोटगी घेण्यासाठी नकार दिला आहे. वृत्तांनुसार, समंथाला सुरुवातीला २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये देण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, तिला आपले नाते संपवण्यासाठी एकही रुपयाही घ्यायचा नव्हता. (Actor Naga Chaitanya And Samantha Divorce Actress Refuses To Accept Alimony RS 200 Crores Explain Reason)
असे म्हटले जात आहे की, आपल्या घटस्फोटामुळे समंथा खूपच तुटली असून चिंतेत आहे. तिला या लग्नाकडून फक्त प्रेम आणि सोबतीची गरज होती. मात्र, आता हे सर्व संपले आहे. त्यामुळे आता तिला यापासून काहीही नकोय.
समंथाने शनिवारी इंस्टाग्रामवर आपल्या घटस्फोटाबाबत एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिले की, “आमचे प्रिय हितचिंतक, खूप विचार केल्यानंतर मी आणि चैतन्यने पती- पत्नीप्रमाणे आपल्या वाटा वेगळ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूपच नशीबवान आहोत की, आमची मैत्री दहा वर्षांपेक्षा अधिक राहिली, जी आमच्या नात्याचा आधार होती. ते आमच्यात नेहमी विशेष नाते ठेवेल.”
https://www.instagram.com/p/CUhawZvrPK9/?utm_source=ig_web_copy_link
पुढे आपल्या पोस्टमध्ये समंथाने लिहिले की, “आम्ही आपले चाहते, हितचिंतक आणि माध्यमांना या कठीण काळात पाठिंबा देण्याची अपेक्षा करतो. आमच्या खासगी गोष्टींचा सन्मान केला गेला पाहिजे. जेणेकरून आम्ही आपले आयुष्य जगू शकू. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.”
नागा आणि समंथाच्या लव्ह स्टोरीला सन २०१० मध्ये आलेल्या ‘ये माया चेसावे’ चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर सुरुवात झाली होती. यानंतर त्यांनी ४ वर्षांपूर्वी म्हणजेच सन २०१०मध्ये साखरपुडा केला होता. पुढे दोघांनीही ७ ऑक्टोबर, २०१७ रोजी गोव्यात लग्नगाठ बांधली होती.
समंथा आणि नागाच्या घटस्फोटाच्या चर्चा मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, कोणीही यावर मोकळेपणाने चर्चा केली नव्हती, पण आता दोघांच्याही घटस्फोटाच्या बातमीवरून सर्वकाही स्पष्ट झाले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, समंथा आणि नागा चैतन्यच्या नात्यात दुराव्याचे कारण हे अभिनेत्रीचे आपल्या करिअरसाठी असलेले प्रेम होते. लग्नानंतर समंथा चित्रपटात बोल्ड सीन देत आहे, जे तिचे सासरे नागार्जुन यांना आवडत नव्हते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-