Saturday, July 6, 2024

अर्रर्र! नागार्जुनाच्या लेकाला पोलिसांनी घेतलेलं ताब्यात, गाडीमध्ये गर्लफ्रेंडसोबत करत होता ‘हे’ कृत्य

गुरुवारी (दि. ११ ऑगस्ट) प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा‘ या सिनेमातून नागा चैतन्य याने बॉलिवूड पदार्पण केले आहे. या सिनेमामुळे नागा चांगलाच चर्चेत आहे. तो पहिल्यांदाच आमिर खान याच्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकला आहे. यापूर्वी तो त्याची एक्स पत्नी समंथा रुथ प्रभू हिच्याशी घटस्फोट घेतल्यामुळे चर्चेत आला होता. नागाने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत एक मोठा खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, त्याला पोलिसांनी पकडले होते.

गाडीच्या मागील सीटवर मेकआऊट करत होता नागा
या मुलाखतीदरम्यान नागा चैतन्य (Naga Chaitanya) याने सांगितले होते की, तो त्याच्या गाडीत गर्लफ्रेंडसोबत विचित्र परिस्थितीत सापडला होता. नागा म्हणाला होता की, “माझ्यासोबत घडले होते. मी हैदराबादमध्ये आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर होतो. माझ्या गर्लफ्रेंडसोबत मेकआऊट करत होतो.” त्याला विचारले गेले की, असे करताना त्याला भीती वाटली नाही का? या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला होता की, “यामध्ये काहीही चुकीचे नाही, खरं तर सांगण्यासाठी एक गोष्ट बनली. मला काहीही समस्या नाहीये. मला माहितीये की, मी काय करत होतो आणि पकडलो गेलो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Chay Akkineni (@chayakkineni)

शोभिता धुलिपालाशी अफेअच्या चर्चा
मागील वर्षा नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू (Naga Chaitanya And Samantha Ruth Prabhu Divorce) यांचा घटस्फोट झाला होता. मागील काही दिवसांपूर्वी अशीही बातमी समोर आली होती की, नागा हा अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिला डेट करत आहे. मात्र, नागाने कधीही त्याच्या अफेअरवर भाष्य केले नाही. मात्र, त्यांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chay Akkineni (@chayakkineni)

नागाचे पाठोपाठ सिनेमे
‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमापूर्वी नागा चैतन्य ‘थँक यू’ या तेलुगू सिनेमात झळकला होता. हा सिनेमा २२ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात नागासोबत राशी खन्ना, मालविका नायर, अविका गौर आणि साई सुशांत रेड्डी यांच्याही भूमिका होत्या. आता तो ‘अनाम’ या सिनेमात काम करत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन वेंकट प्रभू करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पती-पत्नीचं नातं संपलं! सात जन्माच्या शपथा खाऊनही मोडला मानसी नाईक अन् प्रदीप खरेराचा संसार?

आयराच्या एंगेजमेंटमध्ये का होते कमी लाेक सहभागी? समाेर आले कारण

हे देखील वाचा