Friday, July 5, 2024

महेश बाबूच्या भावाला बायकोकडून जोड्यानं मारण्याचा प्रयत्न, हॉटेलवर गर्लफ्रेंडसोबत करत होता ‘हे’ कृत्य

टॉलिवूड सिनेसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुपरस्टार महेश बाबू याचा सावत्र भाऊ आणि अभिनेता नरेश बाबू याची पत्नी राम्या रघुपती हिने त्याच्यावर चप्पलने हल्ला केला आहे. महत्त्वाचं म्हणजे, तिने फक्त नरेशवरच नाही, तर प्रसिद्ध अभिनेत्री पवित्रा लोकेश हिच्यावरही हल्ला केला. रविवारी (दि. ०३ जुलै) तेलुगू अभिनेता नरेश आणि त्याची पत्नी राम्या यांच्यातील वादाने वेगळे वळण घेतले. राम्या म्हैसूरच्या हॉटेलमध्ये पोहोचली, जिथे नरेश अभिनेत्री पवित्रासोबत होता. यानंतर या दोघांनाही राम्याने चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली.

नरेश आणि पवित्रा यांना राम्याकडून चप्पलने मारहाण
अभिनेता नरेश बाबू (Naresh Babu) आणि पवित्रा लोकेश (Pavithra Lokesh) हे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एका खोलीतून बाहेर येताना दिसत आहेत. तसेच, राम्या रघुपती (Ramya Raghupathi) त्यांना आपल्या चप्पलने मारण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, पोलीस दोघांनाही रोखताना दिसत आहेत. व्हिडिओत नरेश मागे वळून हसत हसत शिट्टीही वाजवत आहेत. त्याला सुरक्षा रक्षकांनी पकडले आहे. व्हिडिओत दिसते की, तो तेलुगू भाषेत काहीतरी बोलला आणि उपस्थितांनी राम्या हिला मारहाण करण्यापासून रोखले.

महेश बाबूचा सावत्र भाऊ आहे नरेश, पवित्रासोबत लग्नाच्या अफवा
मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये म्हटले जात आहे की, महेश बाबू (Mahesh Babu) याचा सावत्र भाऊ नरेशने पवित्रासोबत लग्न केले आहे. नरेशने एक व्हिडिओ शेअर करत ही अफवा असल्याचे सांगितले. तसेच, त्याने पत्नीवरही अफवा पसरवल्याचा आरोप केला. त्याने यावेळी असेही म्हटले की, त्याने पत्नीला घटस्फोटाची नोटिसही पाठवली आहे. यामुळे ती त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे.

पवित्रानेही राम्याला ठरवले लबाड
अभिनेत्री पवित्रा हिनेदेखील राम्याला लबाड म्हटले आहे. दुसरीकडे, राम्या माध्यमांशी संवाद साधत आहे. तिने नरेशवर ढोंगीपणाचा आरोप केला आहे. हैराण करणारी बाब अशी की, राम्या ही नरेशची तिसरी पत्नी आहे. दोघेही दीर्घकाळापासून दूर राहत आहेत. पवित्राही आधीपासूनच विवाहित होती. मात्र, तीदेखील वेगळी राहतेय. अशात पवित्रा आणि नरेश यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

वैवाहिक आयुष्यात आयुष्मान खुराना नाही सुखी म्हणाला ‘लग्न माझ्या आयुष्यातील मोठी चूक’

‘जवळच्या व्यक्तिनेच बालपणी लैंगिक शोषण केले होते’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

‘लोकलमध्ये माझ्यावर अत्याचार झाला होता’ मुंबई मेट्रो सुरू करण्याबाबत बोलताना रवीना टंडनने केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा