Wednesday, June 26, 2024

अपना टाईम लाया है! नवाजुद्दीनला करावी लागली होती वॉचमनची नोकरी, आज आहे बॉलिवूडचा महागडा सुपरस्टार

बॉलिवूडमधील जे कलाकार सुपरस्टार म्हणून ओळखले जातात, त्यांच्या यशामागे खूपच मेहनत दडलेली असते. सुरुवातीला त्यांना मिळेल ती भूमिका करावी लागली. कधीकधी तर त्यांच्या वाट्याला १०-२० सेकंदाच्या भूमिकाही आल्या. मात्र, आपला टिकाव लागणार नाही, असा विचार त्यांच्या मनात कधीही आला नाही. त्यांचा यशस्वी बनण्यासाठीचा प्रयत्न सुरूच होता. त्याच जोरावर आज अनेक बॉलिवूड कलाकार सुपरस्टार बनलेत. त्यापैकीच एक म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी होय. नवाजुद्दीन याने ‘सरफरोश’ सिनेमात रोल साकारून कारकीर्दीची सुरुवात केली होती. अशाच छोट्या भूमिका साकारून तो यशस्वी अभिनेता बनला. त्याची गणना आज अव्वल अभिनेत्यांमध्ये होते. चला तर जाणून घेऊया त्याच्या संपत्तीबद्दल…

नवाजुद्दीन सिद्दीकी याची संपत्ती
नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा संघर्षाच्या काळात कूक आणि वॉचमनची नोकरी करायचा. मात्र, आज तो एका सिनेमासाठी तब्बल ६ कोटी रुपये इतके मानधन घेतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, नवाजुद्दीन हा जाहिरातीच्या माध्यमातून चांगलाच पैसा कमावतो. हाती आलेल्या वृत्तानुसार, नवाजुद्दीन प्रत्येक ब्रँडच्या जाहिरातीसाठी १ कोटी रुपये घेतो. त्याची एकूण संपत्ती ही जवळपास ९४ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.

आलिशान घराचा मालक आहे नवाजुद्दीन
नवाजुद्दीन सिद्दीकी हा मुंबईच्या वर्सोवा येथे राहतो. या भागात त्याचे आलिशान घर आहे. आपल्या आलिशान घराकडे पाहून नवाजुद्दीन त्याच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढून एकदा म्हणाला होता की, “त्याच्या नवीन घराचे बाथरूमही त्याच्या जुन्या घरापेक्षा मोठे आहे.” माध्यमांतील वृत्तांनुसार, नवाजुद्दीनच्या घराची किंमत ही १२ कोटी रुपये इतकी आहे. त्याने हे नवीन घर सन २०१७ मध्ये विकत घेतले होते.

महागड्या गाड्यांचा ताफा
कधीकाळी पायी चालणाऱ्या नवाजुद्दीन ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज बेंझ यांसारख्या आलिशान गाड्यांचा मालक आहे. त्याला त्याच्या आलिशान गाड्यांमध्ये फिरायला आवडते. नवाजुद्दीनचा हा प्रवास त्याच्या प्रत्येक चाहत्यासाठी प्रेरणादायी आहे.

सिने कारकीर्द
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने त्याच्या सिने कारकीर्दीत एकापेक्षा एक अशा भूमिका साकारल्या आहेत. मग ती ‘द लंच बॉक्स’मधील भूमिका असो किंवा दशरथ मांझीची भूमिका असो किंवा बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका असो, या प्रत्येक भूमिकेत त्याने जिवंतपणा आणला. त्याचा ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या सिनेमातील अभिनय हा कोणताही चाहता विसरू शकत नाही. नवाजुद्दीनसोबत आज मोठमोठ्या सुपरस्टार्सना काम करायचे आहे. नुकतेच ‘केजीएफ’ स्टार यशनेदेखील ही इच्छा व्यक्त केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, तुटलेल्या हृदयासोबत अभिनेत्याने शेअर केली भावूक पोस्ट
आधी बला’त्कार, नंतर हत्या? सोनालीच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासे, खुनाचा गुन्हा दाखल
बॉलिवूडवर शोककळा! हिट सिनेमे देणारा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, हार्ट अटॅकने घेतला जीव

हे देखील वाचा