Wednesday, June 26, 2024

रुपेरी पडद्यावर स्वत: महिला बनताच नवाजुद्दीनला समजल्या अभिनेत्रींच्या वेदना, म्हणाला, ‘आता मी पण…’

भूमिका सकारात्मक असो किंवा नकारात्मक, प्रत्येक भूमिका लीलला पार पाडणारा अभिनेता म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकी याला ओळखले जाते. छोट्या-मोठ्या भूमिका साकारून नवाजुद्दीन आज सुपरस्टार अभिनेत्यांच्या यादीत जाऊन बसला आहे. आता तो ‘हड्डी’ या त्याच्या नवीन सिनेमाने प्रेक्षकांच्या भुवया उंचावणार आहे. या सिनेमात तो दोन भूमिका साकारत आहे. एक म्हणजे महिलेची आणि दुसरी तृतीयपंथीची. विशेष म्हणजे, महिलांना एका शॉटसाठी तयार व्हायला इतका वेळ का लावतात, हे त्याला समजले आहे. त्याने स्वत: ही गोष्ट स्वीकारली आहे.

‘हड्डी’ या सिनेमातील नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याची पहिली झलक समोर आली होती. ही झलक पाहून प्रत्येकाच्या भूवया उंचावल्या होत्या. मोशन पोस्टरमध्ये एका तृतीयपंथीच्या लूकमध्ये दिसत होता. हे पात्र साकारल्यानंतर त्याला जाणवले की, अभिनेत्रींसाठी तयार होणे हे किती कठीण काम असते. यामुळे त्याच्या मनात अभिनेत्रींबद्दलचा आदर आणखी वाढला आहे.

महिलेच्या रूपात पाहून मुलगी झाली होती नाराज
नवाजुद्दीनने एका मुलाखतीत खुलासा केला की, त्याला शॉटसाठी तयार होण्यास तब्बल ३ तास वेळ लागला होता. ‘हड्डी’ लूकबद्दल चर्चा करताना नवाजुद्दीन म्हणाला की, “जेव्हा माझ्या मुलीने मी महिलेच्या वेशभूषेत तयार झालो, तेव्हा माझी मुलगी माझ्यावर खूप नाराज झाली होती. आता तिला माहितीये की, हे फक्त रोलसाठी आहे आणि आता तिला याची काही अडचण नाहीये.”

‘तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो’
नवाजुद्दीन पुढे बोलताना म्हणाला की, “या अनुभवानंतर माझ्या मनात अशा अभिनेत्रींबद्दलचा आदर आणखी वाढला आहे, ज्या रोज हे सर्व करतात. खूप गडबड असते. केस, श्रृंगार, कपडे, नखे… सर्व संसार घेऊन चालावे लागते. आता मला समजले की, एखाद्या अभिनेत्रीला तिच्या पुरुष जोडीदारापेक्षा व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडायला जास्त वेळ का लागतो. हे पूर्णपणे न्याय्य आहे. आता मी अधिक संयम बाळगेल.”

नवाजुद्दीनच्या ‘हड्डी’ या सिनेमाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्मा यांनी केले आहे. हा एक रिव्हेंज ड्रामा सिनेमा आहे. नवाजुद्दीन आणि अक्षत यांची भेट ‘सेक्रेड गेम्स’ वेबसीरिजच्या सेटवर झाली होती. त्यात अक्षत हे सहाय्यक दिग्दर्शक होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
लग्नाच्या 6 वर्षांनंतर गरोदर झालेल्या बिपाशाने शेअर केला व्हिडिओ, एक्सेप्रेशन्स देत दाखवला बेबी बंप
मलायका आणि अरबाजच्या लग्नात अर्जुन कपूर होता १३ वर्षाचा, फोटो पाहिला का?
‘आता बॉयकॉट करु नका…’ व्हायरल व्हिडिओमुळे नेटकरी झाले ऋतिक रोशनवर फिदा

हे देखील वाचा