Wednesday, June 26, 2024

नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी बनली फिल्म प्रोड्यूसर, ‘या’ कलाकारावर बनवत आहे बायोपिक

आलिया सिद्दीकीने अलीकडेच तिच्या प्रोडक्शन हाऊस वायएस एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या होली काऊ या चित्रपटाचे निर्माते म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. ज्यामध्ये संजय मिश्रा, नवाजुद्दीन सिद्दीकी, तिग्मांशु धूलिया, सादिया सिद्दीकी, मुकेश एस भट्टसह आणि राहुल मित्राने अभिनय केला. चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीरने केले हाेते.
आता आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui ) नवाजुद्दीन सिद्दीकीसाेबत (Nawazuddin Siddiqui) छत्तीसगढचे महान लोक कलाकार, पद्म विभूषण पुरस्कार विजेता तीजन बाई यांच्यावर एक चित्रपट बनवणार आहे.  पांडवानीचे सगळ्यात माेठे कलाकार तीजन बाई यांच्यावर चित्रपट बनवण्यात येत आहे. ही कल्पना आलिया सिद्दीकी यांची हाेती. तीजन बाई हा आलियाचा निर्माता म्हणून दुसरा चित्रपट असेल. स्क्रिप्ट पूर्ण झाली असून आलिया लवकरच स्टार कास्ट आणि शूटिंग कधी सुरू होणार याची घोषणा करणार आहे.
तीजनवर बायोपिक बनवण्यासाठी आलिया म्हणाली, “आता मी महान लाेककलाकार तीजन बाई यांच्यावरील माझ्या ड्रीम प्रोजेक्टवर काम करत आहे. मला नेहमीच अम्मा (तीजन बाई) वर चित्रपट बनवायचा होता. या वयातही ती तासनतास स्टेजवर परफॉर्म करते आणि एक शब्दही विसरत नाही.
नवाज हा थिएटर अभिनेता म्हणून सुरुवातीच्या दिवसांपासून तीजन बाईच्या कामाचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याने त्यांना लाइव परफॉर्म करताना बघितले आहे आणि मला आनंद आहे की नवाज चित्रपटात मुख्य भुमिका साकरणार आहे. जेव्हा महिलांना बोलण्याचा अधिकार नव्हता अशावेळी त्यांनी समाजाने निर्माण केलेल्या नियमांशी लढा दिला आणि ते कौतुकास्पद आहे. मी महामारीपूर्वी सर्व अधिकार घेतले आहेत आणि आता आशा आहे की, या वर्षाच्या अखेरीस शूटिंग सुरू होईल.
तीजन बाई म्हणाली, आलिया सिद्दीकीचा पहिला चित्रपट ‘होली काऊ’  रिलीज झाला आहे. ज्यावर मला स्तुती आणि प्रशंसा ऐकायला मिळत आहे. सर्व लाेक चित्रपटाची प्रशंसा करत आहे. त्याची चित्रपटाला घेऊन सेन्स खुप चांगला आणि खाेलवर आहे. मी या गाेष्टीने फार आंनदी आणि उत्साही आहे की माझ्या बायोपिकचे राइट्स आलिया जवळ आहे आणि आता मी या गाेष्टीची आतुरतेने वाट बघत आहे की,लवकरच ती माझ्या आयुष्याची कथा पडद्यावर घेऊन जगासमोर येणार आहे. मला खात्री आहे की, ती माझ्या आयुष्याची कहाणी त्याच उत्साहाने जगाला सांगेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘चित्रपट प्रदर्शित करण्याची हिच योग्य वेळ..’, आलिया भट्टने बॉयकॉट ट्रेंडवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

इशान खट्टरने केला कॅटरिना कैफच्या विचित्र सवयीचा खुलासा, अशी होती अभिनेत्रीची प्रतिकिया
बॉलिवूडच्या या चित्रपटांवर पडला नाही बॉयकॉटचा प्रभाव, बॉक्स ऑफिसवर केली कोट्यावधीची कमाई

हे देखील वाचा