बॉलिवूड म्हटलं की त्यात कलाकारांच्या आयुष्यातील गोष्टी चव्हाट्यावर आल्याशिवाय राहत नाहीत. मग ते लग्न असो किंवा त्यांचा घटस्फोट किंवा प्रेमप्रकरण… असेच काहीसे आता आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीबरोबर झाले आहे. त्याचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील वर्षी मे महिन्यात नवाजुद्दीनची पत्नी आलियाने ईमेल आणि व्हॉट्सऍपमार्फत अधिकृत नोटीस पाठवून घटस्फोटाची मागणी केली होती. तिने त्याच्यावर गंभीर आरोपही लावले होते. परंतु आता तिचे मन बदलले आहे. आलियाला आता घटस्फोट घ्यायचा नसल्याचे वृत्त समोर येत आहे. याचे कारणही तिने सांगितले आहे.
आलियाने म्हटले आहे की, नवाजुद्दीनसोबतच्या आपल्या नात्याला तिला आणखी एक संधी द्यायची आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत म्हटले आहे की, ‘मला नवाजुद्दीनसोबत राहायचे आहे. त्याच्याकडून मला घटस्फोट घ्यायचा नाहीये.’
जेव्हा आलियाला तिच्या या निर्णयाबद्दल विचारले, तेव्हा तिने म्हटले की, ‘मी मागील १० दिवसांपासून कोरोनाग्रस्त आहे. मी मुंबईतील आपल्या घरातच आयसोलेशनमध्ये आहे. अशामध्ये माझ्या दोन्ही मुलांची काळजी घेण्यात मला खूप त्रास झाला असता, परंतु नवाजुद्दीन यांनी माझी साथ दिली. नवाजुद्दीन सध्या लखनऊमध्ये कोणत्यातरी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. परंतु असे असले तरीही ते आपली ११ वर्षांची मुलगी शोरा आणि सहा वर्षांचा मुलगा यानीची काळजी घेत आहेत.’
https://www.instagram.com/p/Bv1iOd3ADRW/?utm_source=ig_web_copy_link
‘ते मुलांना काय हवं, काय नको याबाबत विचारण्यासाठी फोन करत आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी माझ्या तब्येतीबद्दल जाणून घेण्यासाठी फोन केले आणि माझी विचारपूस केली. त्यांच्या या व्यवहारामुळे मी खूप खुश आहे. त्यांचा हा अंदाज मला खूप भावला आणि मी कुटुंबासाठी त्यांचा हा अंदाज पाहून थक्क झाले आहे. मी आणि नवाजुद्दीन आमच्या आयुष्यातील समस्यांना सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. त्याचसोबत आम्हा दोघांमध्ये बोलणंही होत आहे,’ असेही तिने पुढे म्हटले.
सुरुवातीपासूनच नात्यात अडचणी
यापूर्वीही आलियाने नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठवल्यानंतर पिंकव्हिलाशी बोलताना म्हटले होते की, नवाजुद्दीनला ती सन २००३ पासून ओळखते. ती म्हणाली होती, ‘आम्ही लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात केली होती. त्यांचा भाऊ शम्सही सोबत राहायचा. आम्ही एका चित्रपटात एकत्र काम केले होते. हळूहळू आमच्यातील प्रेम वाढू लागले आणि एकमेकांशी नाते वाढले. त्यानंतर आमचे लग्न झाले. सुरुवातीपासूनच आमच्या नात्यात अडचणी होत्या, परंतु मी विचार केला की यावर तोडगा निघेल. तरीही, १५-१६ वर्षे उलटल्यानंतरही माझा मानसिक त्रास काही कमी झाला नाही.’
‘लग्नापूर्वी आणि लग्नानंतर खूप भांडण झाले’
आलियाने नवाजुद्दीनच्या इतर वैवाहिक अफेअर्सबद्दलही चकित करणारे खुलासे केले होते. तिने म्हटले होते की, ‘मला खूप चांगल्याप्रकारे आठवते की, जेव्हा आम्ही डेट करत होतो आणि आमचे लग्न होणार होते, तेव्हा नवाजुद्दीन इतर मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. त्यामुळे आमचे लग्नापूर्वी आणि लग्नानंतर खूप भांडण झाले.’
‘जेव्हा मी गरोदर होते, तेव्हा मला स्वत: गाडी चालवून चेकअप करण्यासाठी जावे लागायचे. माझ्या डॉक्टरने सांगितले होते की, मी वेडी आहे आणि पहिली अशी महिला आहे, जी प्रसूती करण्यासाठी एकटी आली आहे. जेव्हा मी दु:खात होते, तेव्हा माझा पती माझ्यासोबत नव्हता. तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत चर्चा करत होता. मला सर्व माहिती होते. कारण माझ्याकडे त्या सर्व फोन कॉलचे स्टेटमेंट यायचे,’ असेही तिने पुढे म्हटले होते.
सन २००९ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यांना १ मुलगा आणि १ मुलगी असे २ अपत्य आहेत. मुलाचे यानी आणि मुलीचे नाव शोरा असे आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा–