Wednesday, July 3, 2024

‘बेवफा तुझको मैं बदनाम…’, नीलकमल सिंगची नवीन गजल रिलीज, तुम्ही पाहिली का?

भोजपुरी स्टार नीलकमल सिंग याने फारच कमी वेळात आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले आहे. इंडस्ट्रीचे सुपरस्टार म्हंटल्या जाणार्‍या खेसारी लाल, पवन सिंह, निरहुआ आणि मनोज तिवारी यांच्याप्रमाणेच लोकांना त्यांची गाणीही खूप आवडतात. नीलमकल यांचे गायन आणि अभिनय दोन्ही उत्कृष्ट आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नीलकमलने लव्ह ट्रॅक रिलीज केले होते जे चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. पण आता त्याने आपल्या चाहत्यांसाठी गजल सादर केली आहे.

नीलकमल सिंग (Neelkamal Singh) याने नुकतीच त्याची गजल प्रदर्शित केली आहे. गजलचे नाव “बेवफा तुझको मैं बदनाम न होने दूंगा” असे असून ते हिंदी भाषेत प्रकाशित केलं आहे. गझलचे बोल सुरेख आहेत आणि त्यात स्टारचा अभिनयही अप्रतिम आहे. व्हिडिओमध्ये, प्रियकर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या विश्वासघातला स्वतःची चूक समजतो आणि म्हणतो, “खता तेरी नहीं जो तूने मुझे धोखा दिया…गलती मेरी थी कि जो मैंने तुझे मौका दिया..तेरे ही इरादों को नाकाम न होने दूंगा..सिर तेरे कोई इल्जाम न होने दूंगा…’’

‘बदनाम बेवफा’ या गजलमध्ये एकीकडे निलमकाल सिंग हार्मोनियम वाजवताना गझल गात आहेत, तर दुसरीकडे तो श्वेता महारा (Shweta Mahara) सोबतच्या आठवणींमध्ये रमलेला दिसत आहे. गाण्याचे चित्रीकरण उत्कृष्ट असून दोन्ही स्टार्सचे एक्सप्रेशन खूप प्रभावी आहेत. या गाण्याचे बोल आशुतोष तिवारी यांनी लिहिले आहे, तर शिशिर पांडे यांनी दिग्दर्शन केले आहे. नृत्यदिग्दर्शन राेनक राऊत यांनी केले आहे, ज्यांच्या सांगण्यावर श्वेताने अप्रतिम नृत्य केले आहे. या गझलचे प्रकाशन शुक्रवारी (दि. 14 ऑक्टाेबर)ला ग्लोबल म्युझिक जंक्शन प्रा. लि. यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले. या गजलला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. चाहते गजलवर लाईक आणि कंमेट्स करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी टीव्ही इंडस्ट्रीला ठोकला रामराम, पंजाबी अन् बॉलिवूड इंडस्ट्रीत करणार पदार्पण

उर्फीने प्री-बर्थडे सेलिब्रेशनवर परिधान केला ‘हा’ आगळा वेगळा ड्रेस; चाहते म्हणाले, ‘हिला जंगलात…’

हे देखील वाचा