Monday, July 1, 2024

कोरोनापुढे सुट्टी नाय.! ‘जुग-जुग जियो’ करता करता कलाकारांना झाला कोरोना; दिग्दर्शकही बाधित

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या पत्नी नितु कपूर तसेच अभिनेता वरूण धवन आणि दिग्दर्शक राज मेहता यांना कोव्हिड-१९ ची लागण झाली आहे. चंदिगढ येथे आगामी ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या दरम्याण त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

माध्यमांनुसार नितु कपूर, वरून धवन हे आगामी सिनेमा ‘जुग जुग जियो’या सिनेमात काम करत आहेत. दिग्दर्शक राज मेहता या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. एकाच वेळी हे तिघेही पॉझिटिव्ह आढळल्याने चित्रपटाच्या सेटवर चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

नितु कपूर या सध्या ६२ वर्षाच्या आहेत. आईला कोरोना झाल्याची बाब कळताच रणबीर कपूर याने अत्युच्च उपचारांसाठी नितु कपूर याना एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला नेण्याची व्यवस्था केली. तर अभिनेता वरूण धवन आणि दिग्दर्शक राज मेहता यांनी चंदिगढ येथेच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला.

‘जुग जुग जियो’ या सिनेमात बॉलिवूडची भली मोठी स्टारकास्ट आहे. या सिनेमात नितु कपूर, वरुण धवन, अनिल कपूर, कियारा अडवाणी आणि युट्युबर प्राजक्ता कोळी हे काम करत आहेत.

गेल्या महिन्याभरापासून या सिनेमाचं चित्रीकरण चंदिगढ मध्ये सुरू होतं. मध्ये मध्ये याच सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अनिल कपूर यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु, स्वतः अनिल कपूर यांनी या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं.

आधीच लॉकडाऊनच्या काळात वडील ऋषी कपूर यांचं निधन झालेलं असताना आता आईला देखील कोरोनाची लागण झाल्यानंतर रणबीर कपूरची काय अवस्था झाली असेल याचा अंदाज आपण बांधुच शकता.

हे देखील वाचा