Saturday, June 29, 2024

ओपेनहायमर आणि ‘भगवद गीता’ वादावर ‘श्री कृष्णा’ची प्रतिक्रिया, काय म्हणाले वाचाच

शुक्रवारी (दि. 21 जुलै) ख्रिस्तोफर नोलन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘ओपेनहायमर’ हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा जागतिक बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. दुसरीकडे, या सिनेमामुळे वादालाही सुरुवात झाली आहे. खरं तर, या सिनेमात एक सीन आहे, ज्यात ओपेनहायमर सिनेमाचा मुख्य अभिनेता सिलियन मर्फी, फ्लोरेन्स पुघ यांच्यातील इंटीमेट सीनदरम्यान संस्कृतचे श्लोक म्हटले जात आहेत, जे भगवद गीतामधील भाग असल्याचे बोलले जात आहे.

ओपेनहायमर (Oppenheimer) सिनेमातील या सीनबद्दल भारतीयांनी यावर नाराजी व्यक्त केली. तसेच, म्हटले जात आहे की, सूचना आणि प्रसारण मंत्रालयानेही याविषयी कठोर भूमिका घेतली आहे. अशातच ‘महाभारत’मध्ये श्री कृष्ण साकारणारे प्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bhardwaj) यांनीही याविषयी मत मांडले आहे.

नितीश भारद्वाज ओपेनहायमरच्या बाजूने
माध्यमांतील वृत्तांनुसार, नितीश भारद्वाज म्हणाले की, “गीता ही मुळात युद्धाच्या मैदानात कर्तव्याची जाणीव शिकवते. आपल्या आयुष्यातील संघर्षही मुख्यत: भावनिक, युद्धाच्या मैदानात आहे. श्लोक 11.32मध्ये अर्जुनला एक योद्ध्याच्या रुपात आपले कर्तव्य निभावण्यासाठी सांगण्यात आले होते, जे वाईटाशी लढणे आहे. कृष्णाचा पूर्ण श्लोक योग्यरीत्या समजून घेतला पाहिजे. ते म्हणतात, मी शाश्वत काळ आहे, जो प्रत्येक गोष्टीला मारून टाकेल. त्यामुळे तुम्ही त्यांना मारले नाही, तरीही प्रत्येकजण मरून जाईल. त्यामुळे आपले कर्तव्य पूर्ण कर.”

ओपेनहायमरला त्याच्या शोधाबद्दल खेद
ते म्हणाले की, “जेव्हा ओपेनहायमरने अणुबाँब बनवला आणि याचा वापर जपानची अधिक लोकसंख्या मारण्यासाठी करण्यात आला, तेव्हा तो स्वत: प्रश्न उपस्थित करत होता की, त्याने आपले कर्तव्य व्यवस्थित निभावले आहे का? ते त्यांच्या प्रसिद्ध मुलाखतीत रडताना दिसले होते. याचा अर्थ त्यांना कदाचित त्यांच्या शोधाचा पश्चाताप झाला होता. त्यांनी कदाचित पाहिले होते की, त्यांनी लावलेला शोध भविष्यातील मानवजातीचा नाश करेल आणि त्यांना कदाचित पश्चाताप होता. सिनेमातील या श्लोकाचा वापर ओपेनहायमरच्या भावनिक अवस्थतेतू समजून घेतला पाहिजे. एक वैज्ञानिक आपल्या शोधाविषयी आठवड्यातील वर्षभर विचार करतो, मग तो काहीही करत असेल. त्याच्या मनाची जागा त्याच्या निर्मितीमध्ये पूर्णपणे गढून गेलेली असते. तसेच, शारीरिक क्रिया ही केवळ एक नैसर्गिक यांत्रिक क्रिया असते.”

नितीश यांनी केले नोलनचा संदेश समजून घेण्याचे आवाहन
नितीश भारद्वाज यांनी प्रेक्षकांना ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) याचा संदेशाची योग्यरीत्या समजून घेण्याचे आव्हान केले. ते म्हणाले की, “मी त्या लोकांना आवाहन करतो की, ते ओपेनहायमरच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणातील या भावनिक पैलूबद्दल विचार करा. तो बरोबर सिद्ध झाला नाही का? की आता आपण सर्व लोक स्फोटक तंत्राचा वापर करून स्वतःचा वंश मारताना पाहतोय. आजची स्थिती कुरुक्षेत्रासारखी आहे. त्याचमुळे ब्राह्मण आणि क्षत्रियांनी जाणून बुझून याचा प्रचार केला नाही. युद्धातील वेद- धनुर्वेद. संयुक्त राष्ट्रांनी अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाची गांभीर्याने अंमलबजावणी करावी. नोलनचा संदेश जबरदस्त आणि स्पष्ट आहे.”

नोलन यांचे सिनेमे
ख्रिस्तोफर नोलन हे ब्रिटिश-अमेरिकन दिग्दर्शक आहेत. त्यांनी एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. त्यात ‘डंकर्क’, ‘इंटरस्टेलर’, ‘द डार्क नाईट’, ‘टेनेट’, ‘इनसेप्शन’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. त्यांच्या ओपेनहायमर या सिनेमात मर्फी आणि पुघ यांच्याव्यतिरिक्त रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर, मॅट डेमन यांसारख्या सुपरस्टार्सचाही समावेश आहे. (actor nitish bhardwaj reaction on oppenheimer bhagavad gita controversy)

महत्त्वाच्या बातम्या-
लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगांवकर यांच्यासोबत काम करणारी ”ही” अभिनेत्री आठवते का? जाणून घ्या ‘ती’ सध्या काय करते?
“भाव वाढले पण स्थायी भाव…” जयंत सावरकर यांनी आईशी साधलेला ‘तो’ संवाद तुम्हालाही करेल भावुक

हे देखील वाचा