भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगचे नवीन गाणे ‘करंट’ प्रदर्शित होताच यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. पवन सिंगचे हे भोजपुरी गाणे चाहत्यांना खूप आवडत आहे. तुम्ही यावरून अंदाज लावू शकता की, फक्त २४ तासात पवन सिंगच्या या भोजपुरी गाण्याला ४ दशलक्ष म्हणजेच ४० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्यात पुन्हा एकदा पवन सिंग, प्रसिद्ध संगीतकार पायल देव आणि कोरिओग्राफर मुदस्सर खान या त्रिकुटाने चमत्कार केला आहे, जे प्रेक्षकांनाही खूप आवडत आहे.
पवन सिंगच्या ‘करंट’ या गाण्याने अवघ्या २० तासांत ४ दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. यासोबतच पवनचे हे गाणे सध्या यूट्यूबच्या टॉप ५ ट्रेंडिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या गाण्यात पवन सिंग पूर्णपणे बॉलिवूड स्टाईलमध्ये दिसत आहे, ज्याला प्रेक्षकही प्रचंड पसंती देत आहे.
‘करंट’ गाण्याचे लिरिक्स मोहसीन शेख आणि पायल देव यांनी लिहिले आहेत. त्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये साऊथची सुंदर अभिनेत्री राय लक्ष्मी दिसली आहे. जिच्यासोबत पवनची केमिस्ट्री चांगली दिसत आहे. हे गाणे आदित्य देव निर्मित आहे. पवन सिंगचे प्रत्येक गाणे वेगळे असले, तरी ‘करंट’ भोजपुरी गाणे आतापर्यंतचे सर्वात वेगळे आणि नवीन आहे.
पवन सिंगने भोजपुरी पॉप अल्बमवर गायक म्हणून काम केले आहे. चात्या पहिला अल्बम ओधनिया वाली १९९७ मध्ये आला होता. त्यानंतर २००५ मध्ये ‘कांच कसैली’ हा अल्बम आला होता. २००८ मध्ये त्याने लॉलीपॉप लागेलू (शीर्षक गीत) हा अल्बम प्रसिद्ध केला. पवन सिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘लॉलीपॉप लागेलू’ने ओळख मिळाली.
हे गाण्याने प्रत्येक भाषेतील लोकांना थिरकायला भाग पाडले. त्याच्या २००७ च्या चित्रपटासह ‘गल्ली चुनारिया तोहरे’ नावाने त्याने पहिली प्रमुख भूमिका साकारली.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा