Wednesday, June 26, 2024

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचं प्रकरण थेट सायबर पोलिसांकडे; काय भानगड?

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे फेसबुक खाते अज्ञात चोरट्यांनी हॅक केले आहे. त्याव्यतिरिक्त अभिनेत्याच्या नावाचे बनावट फेसबुक पेज तयार करून प्रसिद्ध कलाकारांना आणि इतरांना फोन आणि मेसेज केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अभिनेत्याने पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून चाेरट्याचा तपास घेणे सुरु आहे.

अभिनेता प्रवीण यांनी त्यांच्या विविध चित्रपटातील भूमिका आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अभिनेता सोशल मीडियावर सक्रिय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात असतो.फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अभिनेत्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांचे अकाउंट अज्ञात चोरट्यांनी घेरले आहे. अभिनेत्याच्या नावाने बनावट फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. त्याशिवाय अभिनेत्याचे मूळ फेसबुक खाते हॅक करण्यात आले आहे.

पाेलिस घेत आहे अज्ञात चोरट्याचा तपास
त्याद्वारे अभिनेता प्रवीण यांच्या नावाने त्याच्या ओळखीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक यांच्यासह प्रसिद्ध कलाकारांना फोन कॉल आणि मेसेज करण्यात येत आहेत. याबाबत तरडे यांना काही मित्रांनी फोन करून विचारणा केली असता, फेसबुक हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार, तरडे यांनी तातडीने रविवारी दि. 9 ऑक्टोबरला पुणे सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी, पोलीस अज्ञात चोरट्याचा तपास घेत आहेत. तरीहि अभिनेता प्रवीण तरडे यांनी चाहत्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याबद्दल खळबळजनक बातमी, सायबर पोलिस प्रकरण
एकदम गुपचूप कारभार! लग्नाच्या 4 महिन्यात अभिनेत्री नयनतारा बनलीये जुळ्या मुलांची आई, विश्वास नसेल तर फोटो पाहा

हे देखील वाचा