Tuesday, July 9, 2024

‘लव्ह सुलभ’! प्रियदर्शन जाधवच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, संपूर्ण टीमचे आभार मानत शेअर केली पोस्ट

‘टाईमपास २’ या चित्रपटातील दगडू म्हणजेच आपल्या सर्वांनाचा लाडका अभिनेता म्हणजे प्रियदर्शन जाधव. या चित्रपटातली त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता प्रियदर्शन एका नवीन चित्रपटातून आणि एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची माहिती त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे.

प्रियदर्शनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्याने त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘लव्ह सुलभ’ असे आहे. त्याच्या या चित्रपटाची शूटिंग नुकतीच पूर्ण झाली आहे आणि लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पोस्टरवर ‘इट्स व्रप’ असे लिहिलेले आहेत. हा पोस्टर शेअर करून त्याने लिहिले आहे की, “अडचणीच्या काळात सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असलेले अनेक नियम आणि निर्बंध असताना हा काळ खूप कठीण होता, तरीही सगळ्या संकटांवर मात करून आमच्या टीमने यश मिळवले आहे. अगदी स्पॉटबॉय, कलाकार तसेच टेक्निशिअन्स यांनी सगळ्यांनीच खूप मदत केली. या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतील हीच अपेक्षा!”

‘लव्ह सुलभ’ या चित्रपटात प्रियदर्शन सोबत प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई, आणि प्रवीण तरडे हे कलाकार दिसणार आहेत. प्रियदर्शन या चित्रपटाचा दिग्दर्शक देखील आहे. तर प्रभाकर परब हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार आणि विशाल घाग हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहे. या चित्रपटाच्या नावावरून सर्वांना या चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे. एकंदरीत या चित्रपटाचे नाव आणि पोस्टर बघता हा चित्रपट सुलभ शौचालय यावर आधारित असणार आहे असा अंदाज येत आहे. अनेक कलाकार या पोस्टरवर कमेंट करून त्यांच्या या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत. तसेच त्याचे चाहते देखील त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. (actor priyadarshan yadav share his upcoming movie poster on social media)

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी पूर्ण केले वचन; बिग बींचा ‘चेहरे’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात होणार रिलीझ

-कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’

-मुली जान्हवी अन् खुशीसाठी खूपच पझेसिव्ह होत्या श्रीदेवी; तर लग्नानंतर ‘या’ कारणामुळे गेल्या त्या चित्रपटसृष्टीपासून लांब

हे देखील वाचा