रुपेरी पडद्यावर पहिला ‘किसिंग सीन’ देणारी अभिनेत्री, जिला भारतीय म्हणायचे पहिली सुपरस्टार


हिंदी सिनेमातील पहिली स्टार अभिनेत्री देविका राणी यांना म्हटले जाते. ज्या काळात मुलींना घर सोडण्याची परवानगी नसायची, अशा काळात त्यांनी अभिनेत्री बनून मुलींसाठी नविन करियच्या संधी शोधली होती. देविका वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या होत्या. तिथे, त्यांनी ‘रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रामाटिक आर्ट’मध्ये अभिनयाचा अभ्यास केला. भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी काम करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक देविका मानल्या जातात.

देविका राणी यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत हिंदी सिनेमाला नवीन उंचीवर नेले. देविका राणींचा जन्म 30 मार्च 1908 रोजी विशाखापट्टणममध्ये झाला होता, तर त्या 9 मार्च 1994 रोजी हे जग सोडून गेल्या. त्यांच्या अभिनयाच्या स्टाईलची तुलना ग्रेटा गार्बोशीही केली गेली. यामुळे त्यांना ‘इंडियन गार्बो’ असेही म्हटले जायचे. दुसरीकडे, त्यांच्या उबदार स्वभावामुळे त्यांना ‘ड्रॅगन लेडी’ देखील म्हटले जायचे.

दरम्यान, प्रसिद्ध निर्माता हिमांशू राय यांच्याशी देविका राणींची यांची भेट झाली. हिमांशू देविकाच्या सौंदर्याने इतके प्रभावित झाले की सन १९३३ मध्ये त्यांनी देविकाला त्यांच्या ‘कर्मा’ चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली, जी देविकाने स्वीकारली. या चित्रपटात हिमांशू राय देविकाचे नायक बनले होते.

हा भारतीयांनी बनवलेला पहिला इंग्रजी बोलका चित्रपट होता. इतकेच नव्हे, तर देविका राणी हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला किसिंग सीन देणाऱ्या अभिनेत्री बनल्या. चित्रपटातील हा सीन 4 मिनिटांचा होता. या सीननंतर देविकावर जोरदार टीका झाली आणि चित्रपटावर बंदीही घातली गेली. यानंतर हिमांशूने देविकाशी लग्न केले.

सन 1936 च्या ‘अछूत कन्या’ या चित्रपटात देविका राणीने एका दलित मुलीची व्यथा मोठ्या पडद्यावर रेखाटली होती. देविका राणी गाणेही छान गायच्या. देविका यांनी स्वत: ‘अछूत कन्या’ चे गाणे गायले होते. देविकाने त्यांच्या नवऱ्यासोबत बॉम्बे टॉकीज नावाचा एक स्टुडिओ तयार केला, ज्याच्या बॅनरखाली त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट बनवले. अशोक कुमार, दिलीप कुमार, मधुबाला आणि राज कपूर यांच्यासारख्या तार्‍यांची कारकीर्द इथूनच घडली. दिलीप कुमार यांना चित्रपटसृष्टीत आणण्याचे श्रेय देविका यांनाच जाते.

सन 1970 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली. तसेच, हा भारतीय सिनेमाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. या पुरस्काराचा प्रथम विजेता बनण्याचा मान देविका राणी यांना मिळाला. त्याशिवाय पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या देविका राणी या चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला ठरल्या.


Leave A Reply

Your email address will not be published.