Saturday, July 6, 2024

अभिनेता पुनीत राजकुमारचे निधन; क्रिकेटर वेंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवरून दिली माहिती

सिनेसृष्टीतून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील ‘पावरस्टार’ नावाने ओळखला जाणारा अभिनेता पुनीत राजकुमारचे शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) निधन झाले आहे. तो अवघ्या ४६ वर्षांचा होता. त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर बंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. अशातच त्याचे निधन झाल्याची बातमी भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवरून दिली आहे. तसेच इतर कलाकारही त्याच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

वेंकटेश यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, “आपले लाडके #PuneethRajkumar यांच्या निधनाबद्दल अत्यंत दु:ख झाले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. मी त्यांच्या चाहत्यांना विनंती करतो की, त्यांनी शांतता राखावी आणि कुटुंबासाठी या कठीण काळात त्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना करावी. ओम शांती.” ( Actor Puneeth Rajkumar Passed Away Cricketer Venkatesh Prasad Tweet)

इतर कलाकारांनाही पुनीतच्या निधनावर ट्वीट करत शोक व्यक्त केला.

अभिनेता पुनीतला चाहते ‘अप्पू’ म्हणायचे. तो दिग्गज अभिनेते राजकुमार आणि पर्वतम्मा यांचा मुलगा होता. त्याने २९ पेक्षाही अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. सन १९८५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बेट्टाडा हूवू’ असे त्या चित्रपटाचे नाव होते. एवढेच नाही, तर ‘चालिसुवा मोडागालू’ आणि ‘येराडू नक्षत्रगालू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला कर्नाटक राज्य पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.

पुनीत ‘अभि’, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरसू’, ‘राम’, ‘हुदुगारू’ आणि ‘अंजनी पुत्र’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी ओळखला जातो. तो शेवटचा ‘युवारत्न’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट याचवर्षी प्रदर्शित झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला उर्फीचा आजार चढलाय काय?’ विचित्र ड्रेसमुळे काजोल आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-मोठा भाऊ घरी येण्याच्या बातमीने अबराम खान झाला भलताच खुश, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-‘अशी’ होती जामीन मंजूर झाल्यानंतर आर्यनची पहिली प्रतिक्रिया, वाचा कर्मचाऱ्यांसह कैद्यांना काय म्हणाला?

हे देखील वाचा