Monday, July 1, 2024

राज कपूर यांनी स्वभावाने लाजाळू असणाऱ्या दिलीप कुमार यांची ‘अशी’ घेतली फिरकी, वाचा भन्नाट किस्सा

हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच प्रेमात पाडले होते. हे कलाकार आज आपल्यात नसले तरी त्यांच्या चित्रपटांची, गाजलेल्या कथांची आजही चर्चा पाहायला मिळते. असाच एक भन्नाट किस्सा अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबतही घडला होता, काय आहे हा किस्सा चला जाणुन घेऊ.

दिलीप कुमार (Dilip kumar) हे हिंदी चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत.त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक चित्रपट सुपरहिट केले आहेत त्यांच्या या गाजलेल्या चित्रपटांची आजही चर्चा पाहायला मिळते. दिलीप कुमार यांनी ‘नया दौर’, ‘मुगल ए आजम’, ‘सौदागर’, ‘राम और श्याम’, ‘देवदास’ अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या चित्रपटाइतकीच त्यांच्या आणि राज कपूर यांच्या त्यांच्या मैत्रीच्याही नेहमी चर्चा पाहायला,ऐकायला मिळायच्या. दिलीप कुमार आणि राज कपूर यांची घट्ट मैत्री होती. त्यांचाच एक भन्नाट किस्सा आज सांगणार आहोत.

दिलीप कुमार हे शांत आणि लाजाळू स्वभावाचे होते. त्यामुळेच ते मुलींपासून लांब रहायचे त्यांच्याशी बोलायला नेहमीच लाजायचे. याउलट राज कपूर थोडे बिनधास्त होते त्यामूळे त्यांच्या अनेक मैत्रिणी होत्या ज्यांच्याशी ते बोलायचे. हा किस्सा राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या कॉलेज जिवनातील आहे. राज कपूर हे दिलीप कुमार यांना एका मुलीसोबत मैत्री करायला सांगत होते. त्यांनी दिलीप कुमार यांना मुलीकडे बोट दाखवत तिला तुझ्याशी मैत्री करायची आहे असे सांगितले. मात्र मुलींपासून आधीच लांब असणारे दिलीप कुमार फक्त हसले आणि तिथून काढता पाय घेतला. ती मुलगीही तिथून निघून गेली. दिलीप कुमार यांना मुलींसोबत बोलायला लावायचा राज कपूर यांचा प्रयत्न मात्र यशस्वी होऊ शकला नाही. हा भन्नाट किस्सा दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रात सुद्धा केला आहे. या दोन्हीही कलाकारांनी आपल्या अभिनयाने चित्रपट जगतात निर्विवाद वर्चस्व गाजवले.

हे देखील वाचा