हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या सौंदर्यावर चित्रपट जगतातील प्रत्येकजण फिदा होता. त्यांच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे अनेक चाहते होते. यापैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी (Hema Malini). हेमा मालिनी यांच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे कौतुक आजही केले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी त्या काळात प्रत्येकाला वेड लावले होते. त्यांच्या बद्दलच जाणून घेऊया एक गाजलेला किस्सा.
नव्वदच्या दशकातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून हेमा मालिनी यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. हेमा मालिनी यांच्या लोकप्रियतेमुळेच त्यांना ‘ड्रीम गर्ल’ हे नाव मिळाले. त्यांच्यावर फक्त सामान्य प्रेक्षक नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील तत्कालिन अनेक दिग्गज अभिनेते फिदा झाले होते. हे अभिनेते हेमा मालिनी यांच्या सौंदर्यावर मोहित झाले होते. यामध्ये धर्मेंद्र (Dharmendra), जितेंद्र (Jeetendra), संजीव कुमार (Sanjeev Kumar)अशा अनेक अभिनेत्यांचा समावेश होता. यामध्ये आणखी एका दिग्गज अभिनेत्याचा समावेश होता, ते अभिनेते म्हणजे राजकुमार (Rajkumar). राजकुमार हे हेमा मालिनी यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. इतकेच नव्हे, तर ते त्यांना प्रपोज देखील करणार होते.
साल 1971 मध्ये ‘लाल पत्थर’ चित्रपटात अभिनेते राजकुमार आणि वैजयंतीमाला (Vaijayantimala) प्रमुख भूमिका साकारत होते. मात्र या चित्रपटासाठी राजकुमार यांना हेमा मालिनी हिरॉईन म्हणून पाहिजे होत्या. त्यांच्या सांगण्यावरून निर्मात्यांनी हेमा मालिनी यांना चित्रपटात यांना भूमिका मिळाली होती. त्याकाळात हेमा मालिनी चित्रपट क्षेत्रात नवीन होत्या. त्यांना हे माहीत नव्हते की राजकुमार यांच्यामुळे आपल्याला ही भूमिका मिळाली आहे. या चित्रपटावेळी दोघांच्यात चांगले संबंध निर्माण झाले होते. हेमा मालिनी सुद्धा राजकुमार यांना जेष्ठ अभिनेते म्हणून मान देत होत्या. मात्र राजकुमार यांनी आपल्या प्रेमाबद्दल हेमा मालिनी यांना सांगण्याचा निर्णय घेतला.
यावर हेमा मालिनी यांनी आश्चर्य व्यक्त करत, त्या असा काही विचार करत नसल्याचे सांगितले होते. यावेळी हेमा मालिनी म्हणाल्या की, “मी तुम्हाला पसंद करते परंतु प्रेम करत नाही.” हेमा मालिनी यांच्या या उत्तराने राजकुमार चांगलेच दुखावले होते. त्यांना हेमा मालिनी आपल्या प्रेमाला नकार देतील याबद्दल अजिबात कल्पना नव्हती. राजकुमार यांच्याप्रमाणे अभिनेते संजीव कुमारसुद्धा हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले होते. मात्र हेमा मालिनी यांनी अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा –
–शाहरुख खानची पत्नी गौरी खानने स्वत: कमवलीय कोटींची संपत्ती, ‘या’ कलेत आहे पारंगत
–जेव्हा राजकुमार यांनी डान्स करताना उडवली होती गोविंदाची मस्करी, पुढे झाले असे की…