Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड ‘कोई मिल गया’ फेम रजत बेदीच्या कारची रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीला धडक; गुन्हा दाखल

‘कोई मिल गया’ फेम रजत बेदीच्या कारची रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीला धडक; गुन्हा दाखल

मुंबईतील अंधेरी स्थित डी. एन. नगर पोलिसात ‘कोई मिल गया’ फेम अभिनेता रजत बेदीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभिनेता रजत बेदी सोमवारी (६ सप्टेंबर) संध्याकाळी जुहू-अंधेरी परिसरातून जात होता. त्यादरम्यान रजतने आपल्या कारने रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला धडक दिली.

डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी मिलिंद कुरडे यांनी सांगितले की, अभिनेता स्वतः गाडी चालवत होता आणि त्याने रस्ता ओलांडणाऱ्या राजेश धूत नावाच्या व्यक्तीला धडक दिली. या घटनेनंतर अभिनेत्याने स्वतः पीडित राजेशला जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल केले. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ आणि ३३८ नुसार गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, ज्या व्यक्तीला अभिनेता रजत बेदीच्या कारने धडक दिली. त्या व्यक्तीचे वय ३९ आहे. ती व्यक्ती डी. एन. नगर परिसरातील रहिवासी आहे. सोमवारी हा व्यक्ती आपल्या कामावरून परतत होता, तेव्हा अचानक रजत बेदीच्या गाडीने त्याला धडक दिली. त्यानंतर त्याला अभिनेत्याने रुग्णालयात दाखल केले. रजत बेदीने जखमीच्या कुटुंबाचीही भेट घेतली आणि त्यांना पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले.

जखमी रुग्णालयात दाखल
अपघाताच्या बाबतीत, डी. एन. नगर पोलीस म्हणाले, “कारला धडक दिल्यानंतर, रजतने स्वतः जखमी व्यक्तीला कूपर हॉस्पिटलमध्ये आणले. अभिनेत्याने स्वतः कबूल केले की जखमी व्यक्तीला त्याच्याच कारने धडक दिली आहे. पीडित सध्या रुग्णालयात आहे.

राजेश धूत यांची प्रकृती चिंताजनक आहे
राजेश धूत यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अभिनेता रजत स्थानिक पोलीस कूपर हॉस्पिटलमध्ये पोहचेपर्यंत निघून गेला होता. मुंबई पोलीस लवकरच रजत बेदी याला फोन करून त्याचा जबाब नोंदवू शकतात. घटना समजण्यासाठी त्या परिसरातील सीसीटीव्हीचीही तपासणी केली जात आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट

-राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

हे देखील वाचा