दोन हजार रुपयांपासून कमाईला सुरुवात करणारे रजनीकांत आज आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक


सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे असे एक अभिनेते आहेत, ज्यांनी केवळ दक्षिणेतच नाही, तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने आपली क्षमता सिद्ध केली आहे. रविवारी (१२ डिसेंबर) रजनीकांत त्यांचा ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र आजही त्यांच्याबद्दल तरुणांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. रजनीकांत आपल्या ऍक्शनने तरुण कलाकारांनाही स्पर्धा देतात. केवळ दक्षिण भारतच नाही, तर आपल्या देशापासून जगभरात सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते आहेत. रजनीकांत यांचा प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात आणि तो प्रदर्शित होताच हाऊसफुल्ल होतो. रजनीकांत यांची गणना सर्वाधिक कमाई करणाऱ्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. चला तर मग जाणून घेऊया की, रजनीकांत एका चित्रपटासाठी किती पैसे घेतात आणि त्यांच्याकडे किती आलिशान गाड्या आहेत.

सुंदर आणि आलिशान घरात राहतात रजनीकांत

रजनीकांत यांचे चेन्नईत अतिशय सुंदर घर असून, या घरात सर्व सोयीसुविधा आहेत. त्यांचे घर खूप आलिशान आहे. रजनीकांत यांनी हे घर अनेक महागड्या अँटिक वस्तूंनी सजवले आहेत. रजनीकांत यांनी हे घर २००२ मध्ये बांधले होते.

rajnikant
rajnikant

रजनीकांत ‘एवढ्या’ मालमत्तेचे आहेत मालक

माध्यमांतील वृत्तानुसार, रजनीकांत एका चित्रपटासाठी सुमारे ५० कोटी रुपये घेतात. परंतु त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, जर चित्रपट फ्लॉप झाला, तर ते निर्मात्याला त्यांची फी परत करतात. यासोबतच रजनीकांत चॅरिटीमध्येही भरपूर पैसा खर्च करतात. रजनीकांत हे ३६५ कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत. रजनीकांत अशा कलाकारांपैकी एक आहेत. ज्यांनी आपल्या करिअरसाठी खूप संघर्ष केला. एक काळ असा होता जेव्हा रजनीकांत यांनी त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपट करिअरमध्ये फक्त दोन हजार रुपयांपासून सुरुवात केली होती.

rajnikant
rajnikant

रजनीकांत यांच्याकडे ‘या’ आहेत गाड्या

त्यांच्या गाड्यांबद्दल बोलायाचे झाले, तर बहुतेक कलाकारांकडे एकापेक्षा जास्त आलिशान गाड्या आहेत. परंतु रजनीकांत यांना लक्झरी कार आवडत नाहीत. त्यांच्याकडे फक्त तीन गाड्या आहेत. इनोव्हा, रेंज रोव्हर आणि बेंटले या त्यांच्या तीन गाड्या आहेत.

हेही वाचा :

खरंच की काय! नोरा फतेही ‘या’ गायकाला करतेय डेट? ‘हे’ फोटो पाहून चाहत्यांना आलीय शंका!

लाफ्टरक्वीन भारती सिंगची संपत्ती ऐकून डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही, शोच्या एका भागासाठी घेते ‘इतके’ मानधन

Oops Moment! रेलिंगजवळ उभी राहून मौनी रॉय देत होती झक्कास पोझ, पण अचानक ड्रेसने केली पंचायत!

 


Latest Post

error: Content is protected !!