मनोरंजनाच्या छोट्या पडद्यावर असे अनेक रियॅलिटी शो आहेत, जे मोठ-मोठ्या कलाकारांना आपल्या शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलवत असतात. त्यातीलच एक शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती १३’ होय. या शोमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी प्रमुख पाहुणे हजेरी लावली आहे. अशातच आता आगामी एपिसोडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री क्रिती सेनन आणि अभिनेता राजकुमार राव दिसणार आहेत. शोमधून दोघेही आपल्या आगामी ‘हम दो हमारे दो’ या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. एपिसोडमधील एका प्रोमोत राजकुमारने आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच त्याने खुलासा केला आहे की, अमिताभ बच्चन यांनी त्याच्या आईच्या निधनानंतर त्याच्यासाठी एक व्हिडिओ मेसेज पाठवला होता.
राजकुमारची आई होती अमिताभ यांची मोठी चाहती
या प्रोमो व्हिडिओमध्ये राजकुमार म्हणतो की, “माझी आई तुमची खूप मोठी चाहती होती. तिचं तुमच्यावर खूप प्रेम होतं. तिने मला सांगितले होते की, जेव्हा तिचे गुडगावला लग्न झाले, तेव्हा तिने फक्त तुमचे पोस्टर सोबत आणले होते आणि ते तिने माझ्या वडिलांच्या बेडरूममध्ये ते ठेवले होते. मग माझे वडील असुरक्षित झाले होते. कारण, अरेंज मॅरेज होते आणि ती अमिताभ बच्चन यांना घरात घेऊन आली आहे. त्यामुळे ते असुरक्षित झाले की, तुम्ही त्यांच्यासोबत (अमिताभ बच्चन) आहात की आमच्यासोबत.” (Actor Rajkumar Rao Remember His Mother Revealed Amitabh Bachchan Sent Special Video)
राजकुमारच्या आईची कधीही झाली नाही अमिताभ यांच्याशी भेट
“मी ‘न्यूटन’चे शूटिंग करत असताना मला बातमी मिळाली की माझी आई या जगात नाही. ती कधीच मुंबईत येऊ शकली नाही, पण तिला (अमिताभ) एकदा भेटायचं होतं, असं ती म्हणायची. म्हणून जेव्हा तिचे निधन झाले, तेव्हा मला खरोखरच वाईट वाटले की, मी तिला तुमची भेट करून देऊ शकलो नाही. त्या रात्री जेव्हा तिचं निधन झालं, तेव्हा मी तुमच्याशी संपर्क साधला आणि तुम्हाला त्याबद्दल सांगितलं,” असेही या व्हिडिओमध्ये तो पुढे बोलताना म्हणाला.
अमिताभ यांनी बनवला होता राजकुमारच्या आईसाठी छोटा व्हिडिओ
“मी तुम्हाला विचारले की, तुमच्याकडून तिच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवणे शक्य आहे का आणि मी तो इतर कोणालाही दाखवणार नाही. मी फक्त तिच्या फोटोसमोर व्हिडिओ प्ले करेल. कारण, तिला फक्त एकदाच तुम्हाला भेटायचे होते. तसेच सर तुम्ही लगेच तिच्यासाठी एक व्हिडिओ बनवला आणि मी तो तिच्या फोटोसमोर प्ले केला. सर काही कारणास्तव तो व्हिडिओ पेन ड्राईव्हमधून आपोआप गायब झाला. हा व्हिडिओ कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही. मला वाटते की हे तुमच्या आणि तिच्यामध्येच असायचे होते. असे केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार,” असे व्हिडिओबद्दल बोलताना राजकुमार म्हणाला. राजकुमारची आई कमलेश यादव यांचे सन २०१६ मध्ये निधन झाले होते.
या कलाकारांसोबत झळकणार आगामी चित्रपटात
राजकुमारच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर राजकुमार आणि क्रिती सेनन सध्या आपल्या आगामी ‘हम दो हमारे दो’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. अभिषेक जैन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात राजकुमार आणि क्रितीव्यतिरिक्त परेश रावल, रत्ना पाठक आणि अपारशक्ती खुराना हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
चाहत्यांना या चित्रपटाचा ट्रेलर भलताच आवडला आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान यांनी केली आहे. सोबतच चित्रपटाचे लेखन अभिषेक, प्रशांत झा आणि अभिजीत खुमान यांनी केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-छळ आणि दुसरे लग्न केल्याच्या आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, पत्नीने केला होता गुन्हा दाखल
-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत