Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर ‘असे’ आहे राजकुमार आणि पत्रलेखाचे वैवाहिक आयुष्य, अभिनेत्याने केले खुलासे

अभिनेता राजकुमार रावच्या लग्नाची काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चा रंगली होती. त्याने आपली मैत्रीण पत्रलेखाशी लग्न केले आहे. दोघेही दीर्घकाळ रिलेशनशीपमध्ये होती शेवटी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता पहिल्यांदाच त्याने आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत बोलताना राजकुमारने(rajkuma rao) लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्याने सांगितले की ‘पत्रलेखाशी लग्न केल्यानंतर मला खूप छान वाटत आहे. ती माझी सर्वात चांगली मैत्रीण, माझे प्रेम, माझे कुटुंब आणि माझ्यासाठी सर्व काही आहे. इतकी वर्षे प्रेमात राहून लग्न करण्याच्या प्रश्नावर राजकुमार राव म्हणतो की “आम्ही काही दिवस एकत्र राहू लागलो. शूटिंगमुळे मी अनेकदा बाहेर असायचो आणि तीसुद्धा तिच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. पण गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊन झाल्यामुळे आम्ही एकत्र राहू लागलो ज्यामुळे आमचे नाते आणखीन घट्ट झाले त्याचबरोबर आम्हाला आम्ही कायमस्वरूपी सोबत राहू शकतो असे वाटू लागले.”

यावेळी लग्नानंतर काय नात्यांमध्ये काही बदल वाटतो आहे का या प्रश्नावर राजकुमारने आपल्या भावना व्यक्त केल्या.तो म्हणाला की, “मला आता परीपूर्ण वाटत आहे. पत्रलेखा आणि मी सध्या पती-पत्नी बनण्याचा सराव करत आहोत. मला आता तिला बायको म्हणायला आवडते.”

यावेळी राजकुमारने अनेक गोष्टींचा खुलासा केला त्यांच्या म्हणण्यानुसार, “तो एकटा असताना थिएटरमध्ये चित्रपट पाहतो आणि एकटाच पाणीपुरीचा आस्वाद घेतो. “जर मी शहराबाहेर असलो आणि माझ्या आजूबाजूला पत्रलेखा नसेल, तर मी एकटाच चित्रपट पाहतो,”असेही राजकुमारने यावेळी सांगितले.

आपल्या नात्याचं वेगळेपण सांगताना तो म्हणाला की कालांतराने कॉल वर बोलणे हळू हळू कमी होते असे ऐकले होते मात्र आमच्या नात्यात आता कॉलवर बोलणे वाढले आहे. दरम्यान अभिनेता राजकुमार राव लवकरच ‘बधाई दो’ या चित्रपटात झळकणार असून त्याच्यासोबत अभिनेत्री भूमि पेडणेकर ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.आता प्रेक्षकांना त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा