बॉलिवूड कलाकार लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये रणबीर कपूर- आलिया भट्ट आणि विकी कौशल- कॅटरिना कैफ यांच्या लग्नाच्या तर तुफान चर्चा होत आहेत. असे म्हटले जात आहे की, या कलाकार जोड्या डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकू शकतात. आता अशी बातमी समोर येत आहे की, या कलाकार जोडप्यांआधी अभिनेता राजकुमार आपली गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत संसार थाटणार आहे.
या दरम्यान होणार लग्न?
खरं तर, माध्यमांतील वृत्तांनुसार, राजकुमार आणि पत्रलेखा नोव्हेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. असे म्हटले जात आहे की, लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, या दोघांनीही १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान कोणत्याही दिवशी लग्न करू शकतात. असेही म्हटले जात आहे की, या जोडप्याने आपले नातेवाईक आणि जवळच्या मित्रांना निमंत्रणही पाठवले आहे. (Actor RajKummar Rao And Patralekhaa May Get Married In Second Week of November Before Ranbir Kapoor Alia Bhatt Vicky Kaushal Katrina Kaif)
खासगी समारंभात होणार लग्न
माध्यमांतील वृत्तांनुसार, राजकुमार राव आणि पत्रलेखा एका खासगी समारंभात लग्न करणार आहेत, ज्यामध्ये फक्त त्यांच्या जवळचे लोक सहभागी होणार आहेत. अद्याप याला अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. पत्रलेखा आणि राजकुमार सन २०१० पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याचबरोबर दोघांनी ‘सिटी लाईट्स’ या चित्रपटातही एकत्र काम केले आहे.
चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह
हे वृत्त समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. चाहत्यांना असा विश्वास आहे की, राजकुमार आणि पत्रलेखाचे लग्न हे कोणत्याही अफवा नसाव्या. तसेच त्यांना अधिक वाट पाहावी लागू नये.
राजकुमारबाबत बोलायचं झालं, तर त्याने सन २०१० मध्ये ‘लव्ह, सेक्स और धोका’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले होते. तो शेवटचा ‘हम दो हमारे दो’ या चित्रपटात झळकला आहे. यानंतर आता तो ‘भीड’, ‘बधाई दो’ यांसारख्या चित्रपटात झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-छळ आणि दुसरे लग्न केल्याच्या आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, पत्नीने केला होता गुन्हा दाखल
-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत