Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘या’ दिवशी रेशीमगाठीत अडकणार राजकुमार राव अन् पत्रलेखा, जाणून घ्या लग्नाची संपूर्ण माहिती

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता राजकुमार राव आणि पत्रलेखा या दोघांनीही हे मैत्रीचे नाते पुढे नेण्याचे ठरवले आहे. दोघंही याच वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नबंधनात अडकून आपले प्रेमसंबंध घट्ट करणार आहेत. कॅटरिना कैफ, विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या बॉलिवूडच्या लव्ह बर्ड्सच्या आधी राजकुमार राव पत्रलेखाला त्याची पत्नी बनवणार आहे. दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

राजकुमार आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या काही मित्रांना लग्न समारंभासाठी आमंत्रित केले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हा सोहळा लवकरच पार पडणार आहे. दोघांच्या लग्नाच्या तारखा १०-११-१२ नोव्हेंबर आहेत. २०१८ मध्ये पत्रलेखाला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ती म्हणाली होती की, लग्नापूर्वी राजकुमार राव आणि त्यांना अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागते. त्यामुळे आता किमान ६-७ वर्ष त्यांचा असा कोणताही प्लॅन नाही. मात्र आता दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १०-११-१२ नोव्हेंबर ही अशी तारीख आहे ज्यामध्ये लग्न होऊ शकते.

राजकुमार आणि पत्रलेखा जवळपास १० वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि खूप दिवसांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहेत. पत्रलेखा त्याला प्रेमाने राज म्हणते. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

पत्रलेखाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “जेव्हा मी एलएसडी (लव्ह सेक्स और धोखा) पाहिला तेव्हा मी त्याला पहिल्यांदा ऑन-स्क्रीन पाहिले. मला वाटले की, चित्रपटात भूमिका साकारलेला तो विचित्र माणूस आहे? पण त्याला भेटल्यावर माझा विचार पूर्णपणे चुकीचा ठरला.”

राजकुमार राव आणि पत्रलेखाचे चाहते त्यांच्या लग्नाची बातमी ऐकून खूप आनंदित झाले आहेत. चाहते सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. राजकुमारच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर नुकताच त्याचा ‘हम दो हमारे दो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये तो क्रिती सेननसोबत दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया- रणबीर अन् कॅटरिना- विकीच्या आधी राजकुमार अन् पत्रलेखा थाटणार आपला संसार; मित्रांना पाठवले निमंत्रण?

-राजकुमारच्या आईची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण; निधनानंतर अमिताभ यांनी अभिनेत्याला पाठवला होता व्हिडिओ

-‘बधाई दो’नंतर अनुभव सिन्हांच्या ‘या’ चित्रपटासाठी भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांनी मिळवला हात

हे देखील वाचा