बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचा ‘हम दो हमारे दो’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनन आहे. यासोबतच परेश रावल, रत्ना पाठक शाह आणि अपारशक्ती खुराना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. राजकुमार त्याच्या चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन करत आहे. दुसरीकडे, राजकुमार आणि पत्रलेखा नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राजकुमारने पत्रलेखाबद्दल केला खुलासा
दरम्यान, ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये आलेल्या राजकुमारने पत्रलेखाशी संबंधित अनेक खुलासे केले. खरं तर, कपिल शर्माने राजकुमारला विचारले की, “मेड इन चायना’ चित्रपटात राजकुमारची भूमिका टायगर सूप आहे, जेणेकरून लोकांचे लग्न चांगले होईल. यानंतर, ‘हम दो हमारे दो’मधील त्याची भूमिका लग्नासाठी बनावट पालकांची व्यवस्था करते, तुम्हाला अशा ऑफर्स मिळतात की, तुमच्या चेहऱ्याला वैवाहिक समस्या खूप चांगल्या प्रकारे सूट होतात?”
यावर उत्तर देताना राजकुमार हसला आणि म्हणाला, “माझे अजून लग्न झालेले नाही, त्यामुळे मला अनुभव घ्यायचा आहे की, काय त्रास होऊ शकतो, कोणते कोणते पापड लाटावे लागतात?” यासोबतच त्याने सांगितले होते की, त्याची गर्लफ्रेंड सुरुवातीला त्याला नीच माणूस समजत होती.
राजकुमार आणि पत्रलेखा यांनी ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटात काम केले होते. तो म्हणाला की, “पत्रलेखाला वाटले की, मी चित्रपटातील पात्राप्रमाणे खऱ्या आयुष्यातही तसाच आहे.” अशा परिस्थितीत पत्रलेखा त्याच्यापासून दूर राहायची आणि बोलायची नाही. पण जेव्हा दोघेही बोलू लागले, तेव्हा दोघेही एकमेकांना पसंत करू लागले.
यासोबतच राजकुमारने पत्रलेखाला भेटण्यापूर्वी त्याची एक जाहिरात पाहिल्याचे सांगितले. राजकुमाराला वाटले ती किती सुंदर मुलगी आहे. त्याने तिच्याशी लग्न करावे. यावर कपिल म्हणाला की, “तुम्ही फक्त एकमेकांकडे बघत आहात की, दोघे एकत्र घरही बघत आहेत?” प्रत्युत्तरात राजकुमार म्हणाला की, “नाही, घरही पाहत आहोत.”
पत्रलेखा आणि राजकुमार १० वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता त्यांच्याबद्दलच्या बातम्या येत आहेत की, दोघेही नोव्हेंबरमध्येच लग्न करू शकतात. त्यांच्या लग्नाला जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ दिवशी रेशीमगाठीत अडकणार राजकुमार राव अन् पत्रलेखा, जाणून घ्या लग्नाची संपूर्ण माहिती
-राजकुमारच्या आईची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण; निधनानंतर अमिताभ यांनी अभिनेत्याला पाठवला होता व्हिडिओ