‘बडे अच्छे लगते हैं’ फेम अभिनेता राम कपूर त्याच्या पत्नी गौतमीसोबत त्याच ठिकाणी पोहोचला आहे, जिथे ते त्यांच्या हनिमूनला गेले होते. मुंबईच्या समुद्रापासून दूर दोघेही सध्या मालदीवच्या समुद्राजवळ एन्जॉय करत आहेत. राम आणि गौतमीने या सुंदर व्हेकेशनचे अनेक अप्रतिम फोटो शेअर केले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मालदीवचे हे शेअर करत रामने (Ram Kapoor) त्याचे वर्णन नंदनवन असे केले आहे. त्याने आपल्या पत्नीसोबतचे अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो मालदीवच्या बीचवर गौतमी कपूरला (Gautami Kapoor) किस करताना दिसत आहे. याशिवाय, तो जिथे राहतोय त्या रिसॉर्टच्या अनेक झलकही त्याने शेअर केल्या आहेत.
गौतमी कपूरने मालदीवच्या सुट्टीतील बोट राईडचा एक मजेदार व्हिडिओही शेअर केला आहे. याशिवाय गौतमीने रिसॉर्टमधील तिच्या खोलीची झलकही दाखवली आहे. गौतमी तिच्या खोलीत कॉफीचा आनंद घेत आहे आणि मुले बाहेर स्विमिंग पूलचा आनंद घेताना दिसत आहेत.
गौतमी कपूरने या रिसॉर्टचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. अलीकडेच गौतमीने मालदीवच्या सुट्टीतील एक जुना फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे. हा फोटो त्याचवर्षी २००३ मधला आहे. जेव्हा रामसोबत लग्नगाठ बांधले होते आणि ते दोघे पहिल्यांदा एकत्र मालदीवला पोहोचले होते. या फोटोत दोघेही खूपच तरुण आणि एकदम फिट दिसत आहेत. ‘घर एक मंदिर’ या मालिकेत दोघेही एकत्र दिसले होते. ही मालिका २००२ मध्ये टेलिव्हिजनवर आली होती.
राम कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर त्याने गौतमी गाडगीळशी लग्न केले आहे. या दोघांची भेट ‘घर एक मंदिर’ या मालिकेदरम्यान झाली. या मालिकेत या दोघांनी दीर-भावजयीची भूमिका साकारली होती. मात्र, पुढे जाऊन या दोघांनी लग्नगाठ बांधली.
राम आणि गौतमी यांच्या प्रेमकहाणीचा प्रवास सोपा होता. कारण गौतमीचे हे दुसरे लग्न होते आणि त्याचमुळे रामच्या घरचे या लग्नासाठी तयार नव्हते. मात्र, रामने घरच्यांना तयार करून त्यांनी १४ फेब्रुवारी, २००३ रोजी लग्नगाठ बांधली. आता या जोडप्याला दोन मुले आहेत.
हेही वाचा-