Wednesday, July 3, 2024

अर्रर्र! प्रितमने ढापलंय ‘केसरिया’ गाणं? ट्विटरवर चाहत्याचा प्रश्न; नेटकऱ्यांकडून सोशलवर मीम्सचा महापूर

चाहते बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र‘ या सिनेमाच्या प्रदर्शनाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. हा सिनेमा यावर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्यापूर्वी या सिनेमातील गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे. मात्र, हे गाणे प्रदर्शित होताच चाहत्यांना यातील एक गोष्ट खटकली आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. काही युजर्स रणबीरच्या या गाण्याला कॉपी म्हणत आहेत, तर काहींना गाण्यातील काही शब्द आवडले नाहीत. चला तर काय भानगड आहे जाणून घेऊया.

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १७ जुलै, २०२२ रोजी ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या सिनेमातील ‘केसरिया’ (Kesariya) हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्याच्या टिझरमुळे आधीच चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे चाहते या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. जेव्हा हे गाणे प्रदर्शित झाले, तेव्हा या गाण्याला २४ तासांच्या आत जवळपास २ कोटी व्ह्यूज मिळाले. हे गाणे सातत्याने ऐकले जात आहे. मात्र, आता या गाण्यातील काही शब्द चाहत्यांना आवडले नाहीत. ते शब्द म्हणजेच, ‘लव्ह स्टोरिया’ (Love Storiya) होय. या शब्दावरून सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. हे गाणे ट्रोल करत यावर मीम शेअर बनवले जात आहेत.

केसरिया गाण्यावरील मीम्स
एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “तुमचे आयुष्य ‘केसरिया तेरा इश्क है पिया’ किती सुंदर आहे. तुम्हा कोणत्याही ‘लव्ह स्टोरिया’मुळे ते खराब होऊ देऊ नका.”

दुसऱ्या एका युजरने विमल इलायचीची जाहिरात शेअर करत त्याला ‘केसरिया’चे सर्वोत्तम व्हर्जन सांगितले.

आणखी एका युजरने असे ‘लव्ह स्टोरिया’ला अभिनेत्यांच्या राऊंड टेबलशी जोडले. त्याने राजकुमार राव, अक्षय कुमार, इरफान आणि आयुषमान खुराना यांच्यामध्ये बसलेल्या वरुण धवन याला या मुलाखतीचा ‘लव्ह स्टोरिया’ सांगून टाकले.

एका युजरने पंचायतचे मीम शेअर करत लिहिले की, “ये का लिखा है बे.”

एकाने २०१३मधील राजस्थानी गाणे शेअर करत लिहिले की, “२०१३मधील ओरिजिनल राजस्थानी केसरिया गाणे. प्रतिमने कॉपी केले की योगायोग आहे?”

‘केसरिया’ गाण्याविषयी
‘केसरिया’ गाण्याविषयी बोलायचं झालं, तर हे गाणे अरिजित सिंग (Arijit Singh) याने गायले आहे. या गाण्याला प्रितम (Pritam) याने संगीतबद्ध केले आहे. तसेच, याचे बोल प्रसिद्ध गीतकार अमिताभ भट्टाचार्य (Amitabh Bhattacharya) यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे बोल सहजरीत्या जीभेवर रुळत आहेत. २ मिनिटे आणि ५२ सेकंदाच्या या गाण्यात ईशा आणि शिवाची लव्हस्टोरी दाखवली आहे.

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘ब्रह्मास्त्र’
अयान मुखर्जी (Ayan Mukerji) दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या सिनेमाच्या पहिल्या भागाची घोषणा ७ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. हा सिनेमा येत्या ९ सप्टेंबर, २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. तसेच, त्यांच्याव्यतिरिक्त या सिनेमात अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अभिनेता नाही, तर ‘डॉक्टर स्ट्रेंज’ला बनायचे होते वकील, ‘या’ कारणामुळे भारतात घालवले एक वर्ष

ब्रेकिंग! प्रख्यात गझलकार, गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

जान्हवी कपूरला स्वतःच्याच भावंडांसोबत करायचाय चित्रपट; म्हणाली, ‘टायटल असेल नेपोटिझ्म!’

हे देखील वाचा