सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे म्हणजे, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट होय. या दोघांच्या बातम्या दरदिवशी माध्यमांमध्ये झळकताना दिसत आहेत. ते त्यांच्या सिनेमाव्यतिरिक्त त्यांच्या येणाऱ्या चिमुकल्यामुळे लाईमलाईटमध्ये आहेत. त्यांनी एकमेकांना ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर यावर्षीच १४ एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या जवळपास २ महिने उलटून गेले आहेत आणि आता ते त्यांच्या पहिल्या मुलाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याने त्याच्या ‘शमशेरा’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्यांच्या येणाऱ्या मुलाबाबत चर्चा केली. यासोबतच त्याने आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचीदेखील प्रशंसा केली. त्याने म्हटले की, आलियासोबत त्याला खूप सुरक्षित वाटते. त्याने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आलिया आणि मी एका मित्राप्रमाणे होतो आणि आम्हाला एकमेकांसोबत खूप चांगले वाटते.”
स्वत: जास्त व्यक्त होत नाही रणबीर
रणबीरने पुढे बोलताना म्हटले की, “आम्ही एकमेकांशी चर्चा करतो. हसतो आणि एकमेकांशी प्रामाणिक आहोत. मी खूप जास्त व्यक्त होणारा व्यक्ती नाहीये, परंतु मी तिच्यापुढे स्वत:ला व्यक्त करत होतो. तुम्हाला माहिती असतं की, तुमच्या मनात कोणासाठी काय आहे, तुम्ही कोणासोबत स्वत:ला सुरक्षित मानता. मला आलियासोबत नेहमीच सुरक्षित वाटते. मला वाटते की, तिलाही माझ्यासोबत सुरक्षित वाटते. आम्ही नशीबवान आहोत की, आम्ही एकमेकांना भेटलो.”
त्यांना नेहमीपासूनच हवं होतं बाळ
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत रणबीर म्हणाला की, तो आणि आलिया पहिल्या दिवसापासून मुलाबाबत विचार करत आहेत. रणबीरने सांगितले की, तो आणि तिच्या पत्नीला नेहमीच बाळ हवं होतं. त्याने म्हटले की, “आयुष्यातील एक नवीन चॅप्टर सुरू करण्यासाठी मी खूपच उत्साही आहे, मी वाट पाहू शकत नाही.”
रणबीर आणि आलिया या सिनेमात झळकणार एकत्र
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Ranbir Kapoor And Alia Bhatt) यांच्याबाबत बोलायचं झालं, तर ते दोघेही पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ते आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात एकत्र काम करणार आहेत. हा सिनेमा ९ सप्टेंबर, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! सोनम कपूरने दिला चिमुकल्याला जन्म? सोशल मीडियावर फोटोची रंगलीय एकच चर्चा
‘खतरों के खिलाडी’मध्ये भिडल्या प्रसिद्ध अभिनेत्री; एकीच्या चाहत्यांनी दुसरीला म्हटले, ‘घमंडी’
फक्त हिंदीतच नाही, तर मराठीतील स्टार किड्सही गाजवतायेच अभिनय क्षेत्र










