Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड आलियाच्या पाठीमागं रणबीर दुसऱ्याच अभिनेत्रीशी करतोय ‘गुलूगुलू’, नेटकरीही म्हणाले, ‘तुला भीती नाही का वाटत?’

आलियाच्या पाठीमागं रणबीर दुसऱ्याच अभिनेत्रीशी करतोय ‘गुलूगुलू’, नेटकरीही म्हणाले, ‘तुला भीती नाही का वाटत?’

सध्याच्या घडीला कोणता बॉलिवूड अभिनेता चर्चेत असेल, तर तो म्हणजे रणबीर कपूर होय. तो सतत माध्यमांमध्ये झळकत आहे. अशात त्याचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्याच्यासोबत आलिया भट्ट नाही, तर भलतीच अभिनेत्री दिसत आहे. आता हे फोटो सोशल मीडियाचा पारा वाढवत आहेत. या फोटोतील जोडी इतकी हॉट दिसत आहे की, रणबीरची पत्नी आलिया भट्ट हिलादेखील वाईट वाटू शकते.

पाहायला मिळाली रणबीर आणि वाणीची केमिस्ट्री
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच ‘शमशेरा’ (Shamshera) या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याची जोडी वाणी कपूर (Vaani Kapoor) हिच्यासोबत दिसणार आहे. नुकतेच या दोघांनीही फोटोशूट केले. हे पाहून कुणालाही घाम फुटल्यावाचून राहणार नाही. या फोटोत रणबीर आणि वाणी या दोघांचीही केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. दोघेही फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.

रोमँटिक अंदाज
या फोटोत रणबीर आणि वाणी (Ranbir And Vaani) दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. रणबीर या फोटोत मरून रंगाच्या सूट पँटमध्ये दिसत आहे, तर वाणी काळ्या रंगाच्या ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये ग्लॅमरचा तडका लावताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये रणबीर गंजी परिधान केली आहे, आणि वाणीला कुशीत घेऊन फोटो काढत आहे. या दोन्ही फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

या फोटोंना २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, या फोटोंवर १ हजारांहून अधिक कमेंट्सचा पाऊसही पडला आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, “आलियाच्या पतीसोबत गुलूगुलू फोटोशूट.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “अरे भावा आलिया मॅडमची भीती वाटत नाहीये का?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

या महिन्यात प्रदर्शित होणार सिनेमा
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘शमशेरा’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हा सिनेमा येत्या २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी व्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘तू काका बनलास, तू मामा बनलास’, बाप बनण्याच्या आनंदात रणबीरने जोडले पॅपराजींशी नाते

साऊथच्या अभिनेत्याकडून घृणास्पद कृत्य, लहान मुलींसमोरच झाला उघडा; पोलिसांकडून अटक

शॉकिंग! सलमान राहिला बाजूला, आता त्याच्या वकिलाच्या जीवावर उठलीय ‘ही’ टोळी; म्हणाली, ‘तुझाही गेम होणार’

हे देखील वाचा