जवळपास ३-४ वर्षांनंतर अभिनेता रणबीर कपूर हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. एक नाही तर त्याचे २ सिनेमे प्रदर्शनासाठी तयार आहेत. यापैकी एक म्हणजे ‘शमशेरा‘ आणि दुसरा म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’ होय. आतापर्यंतचे सर्वात वेगळे पात्र साकारत असलेल्या रणबीरच्या ‘शमशेरा’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. हा सिनेमा येत्या २२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री वाणी कपूर ही मुख्य भूमिकेत आहे. दोघेही त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी चांगलीच मेहनत घेताना दिसत आहेत. अशातच प्रमोशनसाठी रियॅलिटी शोच्या सेटवर पोहोचल्यानंतर, त्यांना गर्दीचा सामना करावा लागला होता.
गर्दीत अडकले होते रणबीर आणि वाणी
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) यांचा या गर्दीतील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन्ही कलाकार गर्दीतून झटपट पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यासोबतच रणबीर वाणीला गर्दीपासून वाचवण्याचाही (Ranbir Save Vaani From Crowd) प्रयत्न करताना दिसत आहे.
View this post on Instagram
चाहत्यांकडून रणबीरचं कौतुक
रणबीर आणि वाणीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते रणबीर कपूरवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने म्हटले की, “रणबीर सभ्य व्यक्ती आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “एक व्यक्ती, ज्याला महिलांची किंमत माहितीये, त्यामुळेच रणबीर सर्वांचा आवडता आहे.” त्याच्या आणखी एका चाहत्याने लिहिले की, “तो सुपरस्टार आहे.” मात्र, काही चाहत्यांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. तसेच, त्यांनी म्हटले आहे की, “रणबीर वाणीला ढाल बनत स्वत:ला वाचवत आहे की, दुसरं काही करत आहे?”
काय आहे सिनेमाची कहाणी?
‘शमशेरा’ या सिनेमात रणबीर एकदम वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. यापूर्वी त्याने असे पात्र कधीही साकारले नव्हते. तो या सिनेमात तो वाढलेले केस, लांब दाढी अशा वेशात दिसत आहे. या सिनेमाची कहाणी १८व्या शतकातील आहे. यामध्ये डाकूंची एक आदिवासी प्रजाती आपल्या अधिकारांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशांविरुद्ध भिडताना दिसत आहेत. या सिनेमात अभिनेता संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अक्षय कुमारच्या अभिनेत्रीला बिझनेसमनने दिलेली भयंकर ऑफर, म्हणालेला, ‘२५ लाख देतो पगारी पत्नी बन’
‘नवरा गेल्यावर हिला तर पंख फुटलेत’, नीतू कपूरने ट्रोलर्सला दिले खणखणीत शब्दात उत्तर