बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट होतात. ते नेहमीच त्यांच्या अफेअरमुळे चर्चेचा विषय ठरत असतात. रणबीर कपूरने त्याचा ३९ वा वाढदिवस मंगळवारी (२८ सप्टेंबर २०२१) साजरा केला आहे. यावेळी अभिनेता वाढदिवस साजरा करण्यासाठी गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत जोधपूरला पोहोचला. रणबीरने आपला वाढदिवस आलियासोबत एकांतात साजरा केला. आता बुधवारी दुपारी रणबीर आणि आलिया जोधपूरहून मुंबईत आले आहेत. त्याचवेळी जोधपूर विमानतळावर रणबीर आलियाला चाहत्यांच्या गर्दीतून वाचवताना दिसला.
जोधपूर विमानतळावरून रणबीर आणि आलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर आणि आलिया जोधपूर विमानतळावर जाताना दिसत आहेत. जेव्हा चाहत्यांची आणि मीडियाची गर्दी रणबीर आणि आलियाच्या दिशेने येत होती, तेव्हा रणबीर त्याच्या गर्लफ्रेंडचे संरक्षण करताना दिसला.
या दरम्यान, आलिया भट्टने तपकिरी रंगाची स्पोर्ट्स ब्रा घातली होती, ज्यावर तिने पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती. त्याचवेळी रणबीर कपूर ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. रणबीरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे दोघे पालीतील सुजान जवाई रिसॉर्टमध्ये पोहोचले होते.
रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यात तिने रणबीर तिचे आयुष्य आहे असे सांगितले. दोघेही एका किनाऱ्यावर सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसले. फोटो पोस्ट करत आलियाने लिहिले की, “हॅपी बर्थडे मेरी लाइफ.” यासोबत रेड हार्ट इमोजी देखील वापरले आहेत. आलिया आणि रणबीरने ज्या रिसॉर्टमध्ये दोन रात्री घालवल्या, त्याचे भाडे तब्बल ७० हजार ते १.६५ लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर रणबीर आणि आलिया लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामध्ये पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय, आलिया ‘रॉकी और रानी की लव्ह स्टोरी’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘आरआरआर’, ‘डार्लिंग’, तर रणबीर कपूर ‘शमशेरा’, ‘ऍनिमल’मध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल
–बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम