चित्रपट निर्माते संदीप रेड्डी वंगा यांच्या आगामी बहुप्रतिक्षित चित्रपटाची तयारी आता सुरु झाली आहे. माध्यमांतील वृतानुसार, या चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी म्हणजेच एप्रिल २०२२ मध्ये सुरू होईल. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबतच एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या चित्रपटाची शूटिंग ऑक्टोबरपर्यंत होईल अशी माहिती समोर येत आहेत. संदीप रेड्डी वंगा यांनी यापूर्वी शाहिद कपूर स्टारर ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
रणबीर कपूरसोबतच अनिल कपूर, बॉबी देओल आणि परिणीती चोप्रा ‘ॲनिमल’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. माध्यमांतील वृतानुसार, सध्या या सर्व स्टार्सच्या तारखा आणि शूटिंग शेड्यूलवर काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट गँगस्टरवर आधारित कौटुंबिक कथा असेल, ज्यात प्रेक्षकांना भावनांसोबत जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळेल. रणबीर कपूर ‘ॲनिमल’ चित्रपटात’ मनोरुग्णाच्या भूमिकेत दिसणार असल्याचेही सांगितले जात आहे.
रणबीर कपूर सध्या निर्माता लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रणबीरसोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे. एका माहितीनुसार या चित्रपटाचा बहुतांश भाग चित्रीत करण्यात आला आहे आणि काही भाग परदेशात शूट केला जाणार आहे, फक्त तोच शूट करणे बाकी आहे. या चित्रपटाचा उर्वरित भाग पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला शूट केला जाईल. चित्रपट निर्माते लव रंजन यांचा चित्रपट पुढील वर्षी २०२२ मध्ये प्रदर्शित होईल, तर ‘ॲनिमल’ चित्रपटाबद्दल अशी माहिती समोर आली आहे की, हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होईल.
‘ॲनिमल’ चित्रपटापूर्वी रणबीर कपूर ‘शमशेरा’मध्ये दिसणार असून, या चित्रपटात रणबीर वडील आणि मुलाच्या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रणबीर कपूर अयान मुखर्जीच्या चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’मध्ये लेडी लव्ह आलिया भट्टसोबत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बिग बॉसपेक्षा जास्त पैसे मी बाहेर राहून कमावू शकते, म्हणत ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीने धुडकावली ऑफर