Saturday, June 29, 2024

कपूर कुटुंबाला मोठा धक्का! दिग्गज अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण, मुंबईच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टर म्हणाले…

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आख्खा भारत देश दणाणून सोडला आहे. सामान्य नागरिकांसोबतच मोठ- मोठे दिग्गज कलाकारांनाही कोरोनाची लागण होताना दिसत आहे. अशातच आता बॉलिवूडमधून आणखी एक मोठी बातमी येत आहे. ती म्हणजे अभिनेत्री करीना कपूर खानचे वडील आणि दिग्गज अभिनेते रणधीर कपूर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोकिलाबेन रुग्णालयाचे सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर संतोष शेट्टी यांनी सांगितले की, मागील रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ज्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसत आहे.

कपूर खानदानातील या व्यक्तींना झाला होता कोरोना
विशेष म्हणजे यापूर्वी कपूर कुटुंबातील रणबीर कपूर आणि त्याची आई नीतू कपूर यांनाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यांनी त्यावर मात केली.

कपूर खानदानातील एकमेव व्यक्ती
‘शो मॅन’ नावाने प्रसिद्ध असलेले दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पाच अपत्यांपैकी तिघांचे निधन मागील दीड वर्षात झाले आहे. तीन भावांमध्ये रणधीर हे कपूर खानदानातील सध्या एकुलते (एकमेव) आहेत. त्यांचे मधवे भाऊ ऋषी कपूर यांचे निधन मागील वर्षी ३० एप्रिल, २०२० रोजी झाले होते. त्यानंतर ९ फेब्रुवारी, २०२१ रोजी धाकटे भाऊ राजीव कपूर यांचे निधन झाले होते. दुसरीकडेे राज कपूर यांना दोन मुलीही आहेत. त्यात रीमा जैन आणि ऋतु नंदा यांचा समावेश आहे. त्यातील ऋतु नंदा यांंचे मागील वर्षी १४ जानेवारी, २०२० रोजी निधन झाले होते.

याव्यतिरिक्त कपूर खानदान सध्या दिवंगत अभिनेता राजीव कपूर यांच्या प्रॉपर्टी वादामुळेही चर्चेत आहे. खरं तर घटस्फोटीत राजीव यांना कोणतेही मूल नाहीये. त्यांची संपत्तीचे प्रकरण न्यायालयात आहे. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने रणधीर कपूर आणि रीमा जैन यांच्याकडे राजीव यांच्या घटस्फोटाचे कागदपत्र मागितले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खरंच! आयुष्यातील पहिली किस म्हणत रणबीर कपूरने घेतले होते माधुरी दीक्षितचे नाव, सांगितले कधी आणि कसे

-याला म्हणतात गाण्याची जादू! हिमेश रेशमियाच्या ‘या’ गाण्यामुळे सापडला होता खरा चोर, दोन रात्रीत उडवले होते एक लाख रुपये

-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा