बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने ६ जुलै रोजी त्याचा ३७वा वाढदिवस साजरा केला. त्याने पत्नी दीपिका पदुकोण हिच्यासोबत आपला खास वाढदिवस साजरा केला. जोडपं त्याच्या वाढदिवसासाठी परदेशात होते. आता या दोघांनी त्यांच्या खास क्षणांचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दोघांनीही फोटो केले शेअर
रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या सुंदर प्रवासाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. रणवीरची पोस्ट जंगलाच्या अनुभवाबद्दल होती, तर दीपिकाने तिच्या बायकिंग प्रवासातील फोटो आणि समुद्रकिनाऱ्यावरचे फोटो शेअर केले आहेत.
रणवीरने त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत, “लव्ह टू लव्ह यू #baby #birthday #photodump.”
View this post on Instagram
दीपिकाने तिच्या व्हॅकेशनची झलक शेअर करताना लिहिले की, “आपले जीवन नवीन अनुभव आणि साहसांनी भरलेले असू दे.” तिच्या या फोटोंना तब्बल १७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, ५ हजारांहून अधिक कमेंट्सचाही पाऊस तिच्या पोस्टरवर पडला आहे.
View this post on Instagram
भारतात परतले रणवीर आणि दीपिका
रणवीर आणि दीपिका सोमवारी (दि. ११ जुलै) सकाळीच अमेरिकेहून मुंबईला परतले. हे जोडपे एका आठवड्याच्या सुट्टीवर होते, जिथे त्यांनी त्यांच्या व्यस्त शूटिंग वेळापत्रकातून एकत्र चांगला वेळ घालवला.
रणवीर आणि दीपिकाचे आगामी सिनेमे
त्याचबरोबर या दोघांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर दीपिका पदुकोण लवकरच शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्यासोबत ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम (John Abraham) हादेखील मुख्य भूमिकेत आहे. त्याचवेळी रणवीर सिंग करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) हिच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय रणवीर रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘सर्कस’ या चित्रपटातही दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-