Saturday, July 6, 2024

गोविंदाला पाहून रणवीर सिंगच्या डोळ्यातून तरळले अश्रू; अभिनेता म्हणाला, ‘माझा देव…’

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आजकाल त्याच्या टीव्ही शो ‘द बिग पिक्चर’मधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या शोमध्ये सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटीही सहभागी होतात. या एपिसोडमध्ये नववर्षाच्या निमित्ताने बॉलिवूडचा हिरो नंबर वन म्हणजे गोविंदा (Govinda) या शोचा एक भाग बनला. त्याला शोच्या मंचावर पाहून प्रेक्षक रोमांचित झाले. पण रणवीर स्वतःच सर्वात जास्त एक्साइटेड दिसला. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहून तो स्वतःच्या भावनांना आवर घालू शकला नाही. शोदरम्यान रणवीरने गोविंदाला आपला देव म्हटले.

रणवीर सिंगच्या डोळ्यात आले अश्रू
या विशेष भागाचा एक प्रोमो व्हिडिओ कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. आपल्या आवडत्या हिरोचे स्वागत करताना रणवीर भावूक झाल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. गोविंदा समोर येताच नेहमी हसतमुख असलेल्या रणवीरच्या डोळ्यात पाणी येते. त्याला रडताना पाहून गोविंदाही भावूक झाला. त्याने रणवीरला शांत केले. त्याने रणवीरच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आपल्या हातांनी पुसले, त्यानंतर दोन्ही कलाकारांनी एकमेकांना मिठी मारली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गोविंदाला रणवीर मानतो देव
शोमध्ये गोविंदाचे स्वागत करताना रणवीरने त्याला आपला देव म्हटले. रणवीर म्हणाला की, “आज नवीन वर्षाच्या खास प्रसंगी माझा देव स्वतः मला भेटायला येत आहे. फक्त आणि फक्त हिरो नंबर वन गोविंदा.” गोविंदा स्टेजवर येताच रणवीर त्याच्या पायाजवळ झोपतो. मग गोविंद त्याला उचलून मिठी मारतो.

रणवीर-गोविंदा थिरकले स्टेजवर
शो दरम्यान दोन्ही कलाकारांनी खूप धमाल केली. गोविंदाच्या सुपरहिट गाण्यांवर रणवीरने डान्सही केला. ‘इश्क है सुहाना’ आणि ‘यूपी वाला ठुमका’ यांसारख्या गाण्यांवर रणवीर-गोविंदाने आपल्या डान्स मूव्ह्जने प्रेक्षकांचे मन जिंकले. गोविंदाची पत्नी सुनीता, मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन आहुजा देखील व्हिडिओ कॉलद्वारे शोमध्ये सामील झाले.

‘किल दिल’ चित्रपटात केले आहे एकत्र काम
रणवीरने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये गोविंदा हा त्याचा आवडता अभिनेता असल्याचे सांगितले आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘किल दिल’ या चित्रपटात जेव्हा रणवीरला त्याच्या आवडत्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा तो खूप आनंदी झाला होता. रणवीरने त्याच्या एका मुलाखतीत म्हटले होते की, “गोविंदा जी एक दिग्गज आहेत आणि ते स्वतःच अभिनयाची शाळा आहेत. मी त्यांचा मोठा चाहता आहे. मी त्यांचे चित्रपट पाहिले आहेत. मी काही चित्रपट ५० पेक्षा जास्त वेळा पाहिले आहेत. मला त्यांचे चित्रपट तर आवडतातच पण मला ते देखील खूप आवडतात.”

रणवीर सिंग सध्या खूप चर्चेत आहे आणि त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘८३’ च्या यशाचा आनंद घेत आहे. चित्रपटात रणवीरने भारतीय क्रिकेटचे दिग्गज कपिल देव आणि दीपिका पदुकोणने त्याची पत्नी रोमी देवची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा