Monday, July 1, 2024

क्या बात है! रणवीर सिंगने आईच्या बर्थडे पार्टीत लावले जोरदार ठुमके; पाहा कसा नाचतोय अभिनेता

बॉलिवूडमध्ये मजा- मस्ती करणारे अनेक अभिनेते आपल्याला पाहायला मिळतील. मात्र, यातील एक अभिनेता जरा जास्तच मजा- मस्ती करतो. तो अभिनेता इतर कोणी नसून अभिनेता रणवीर सिंग होय. रणवीरच्या मजा- मस्तीबाबत सर्वांनाच माहिती आहे. संधी मिळताच तो सर्वांचेच मनोरंजन करण्यासाठी सज्ज असतो. सध्या रणवीरचा आपली आई अंजू भवनानीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अभिनेता शर्ट काढून आईसोबत थिरकताना दिसत आहे. त्याचबरोबर पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतही त्याने मस्ती केली. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाहीत.

खरं तर रणवीरची आई अंजू यांनी आपला वाढदिवस साजरा केला. एका रेस्टॉरंटमध्ये लंच पार्टी ठेवण्यात आली होती. या खास क्षणी रणवीरने चांगलीच धमाल मस्ती केली. आईसोबत रणवीर ‘दिल चोरी साडा हो गया’ गाण्यावर शर्टलेस होईन केवळ बनियान आणि ट्राउझरमध्ये डान्स करताना दिसत आहे. शानदार मूव्हज आणि स्टेप्ससह डान्स करत लोकांचे मनोरंजन करत आहे. त्याचबरोबर त्याची आईदेखील आपल्या मुलाला साथ देताना दिसत आहे. अनेकांनी अंजू यांना रणवीरची बहीण समजल्याचे बोलले जात आहे. रणवीरने आपल्या अफलातून डान्सने सर्वांना डान्स करण्यास भाग पाडले. (Actor Ranveer Singh Dance With Mother And Tease Deepika Padukone Video Viral On Internet)

या व्हिडिओव्यतिरिक्त आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोणही दिसत आहे. रणवीर दीपिकासमोर ‘नशे सी चढ़ गई’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तसेच तिला चिडवताना दिसत आहे. रणवीरच्या या अशा वागण्याची दीपिकाही मजा घेत आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ते लवकरच ‘८३’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट स्पोर्ट्सवर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत, तर दीपिका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिकिनी अन् दोन वेण्या घालून अभिनेत्री मोनालिसाने केले मालदीवमधील फोटो शेअर, पतीही दिसला शर्टलेस

-‘सुंदरा गं माझी’, सायली संजीवच्या स्टायलिश लूकवर ‘या’ अभिनेत्रीची लक्षवेधी कमेंट

-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल

हे देखील वाचा